मुंबई, 8 जानेवारी : केपीआर मिल (KPR Mill) हा स्टॉक गेल्या 1 वर्षात चर्चेत आहे. गेल्या 1 महिन्यात केपीआर मिलचा शेअर (KPR Mill share Price) 530.30 रुपयांवरून 716.20 रुपयांपर्यंत वाढला आहे. म्हणजेच या महिनाभराच्या कालावधीत शेअर 185.90 रुपयांनी किंवा 35.06 टक्क्यांनी वधारला आहे. गेल्या 6 महिन्यांत हा शेअर 235.06 वरून 716.20 रुपयांवर गेला आहे. म्हणजे गुंतवणूकदारांना (Investors) प्रति शेअर 362.14 रुपये किंवा 102.28 टक्क्यांचा नफा झाला आहे. KPR Mill शेअर गेल्या एका वर्षात म्हणजे 8 जानेवारी 2021 रोजी 191.54 रुपयांवरून 524.66 रुपये किंवा 273.92 टक्क्यांनी वाढून 716.20 रुपये झाला आहे. या मिडकॅप कंपनीची मार्केट कॅप 23,756 कोटी रुपये आहे. कंपनी सूत, कापड, वस्त्र, पांढरी क्रिस्टल साखर तयार करते. कंपनी रेडीमेड विणलेले कापड देखील तयार करते. याशिवाय, कंपनी विविध प्रकारे कापड उत्पादने तयार करते. Cashback on LPG : घरगुती सिलेंडरवर मिळवा कॅशबॅक, या अॅपवरुन करा बुकिंग ब्रोकिंग फर्म Edelweiss चे म्हणणे आहे की 12 महिन्यांसाठी 860 रुपयांच्या टार्गेटसह या स्टॉकवर खरेदी करा. ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे की, सध्या कापड आणि इथेनॉल हे भारतीय बाजारपेठेतील 2 सर्वात मजबूत थीम आहेत. सरकार या दोन क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करेल अशी अपेक्षा आहे. नवीन घर घ्यायचा विचार करताय? ‘ही’ कंपनी देतेय 6.46 टक्के व्याजदराने होम लोन KPR मिल ही भारतातील सर्वात मोठ्या टेक्सटाईल कंपन्यांपैकी (Textiles Companies) एक आहे. याशिवाय साखर आणि इथेनॉल क्षेत्रातही कंपनी आपली पकड आणखी मजबूत करण्यावर भर देत आहे. यासाठी कंपनी इथेनॉल उत्पादन क्षमताही वाढवणार आहे. हे पाहता कंपनीच्या व्यवसायात पुढे चांगली वाढ होण्याची शक्यता असून त्याचा फायदा गुंतवणूकदारांनाही मिळेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.