Home /News /money /

Asia Economic Dialogue 2022: Green Energy क्षेत्रात एनर्जी क्षेत्रात भारत करू शकेल जगाचं नेतृत्व - मुकेश अंबानी

Asia Economic Dialogue 2022: Green Energy क्षेत्रात एनर्जी क्षेत्रात भारत करू शकेल जगाचं नेतृत्व - मुकेश अंबानी

Asia Economic Dialogue 2022 या शिखर परिषदेचं आयोजन पुण्यात करण्यात आलं होतं.

नवी दिल्ली, 23 फेब्रुवारी: पुणे इंटरनॅशनल सेंटर पॉलिसी रिसर्च थिंक टॅंक (Pune International Center Policy Research Think Tank) आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने (Ministry of Foreign Affairs) 23 ते 25 फेब्रुवारीदरम्यान आशिया इकॉनॉमिक डायलॉगचं (Asia Economic Dialogue) आयोजन करण्यात आलं आहे. आज (बुधवारी, 23 फेब्रुवारी 22) या शिखर परिषदेचं (Summit) उदघाटन झालं. या वेळी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे (Reliance Industries Limited) व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी शिखर परिषदेमध्ये आपले विचार मांडले. शिखर परिषदेची `थीम रिसायलंट ग्लोबल ग्रोथ इन ए पोस्ट पँडेमिक वर्ल्ड` अशी आहे. यावेळी त्यांनी ग्रीन एनर्जीला चालना देण्याबाबत आणि या क्षेत्रातील भारताच्या आघाडीच्या भागीदारीबाबत अंबानी यांनी भाष्य केलं. 'ग्रीन एनर्जी क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी भारत हा एक चांगला आणि आकर्षक पर्याय आहे', असं मुकेश अंबानी यांनी सांगितलं. अंबानी म्हणाले, "पुणे हे आयटी (IT) उद्योगाचं प्रमुख केंद्र झालं आहे. ग्रीन एनर्जीचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. भारत सातत्याने प्रगती करत आहे. भारत परवडणाऱ्या किंमतीत मिळणाऱ्या ग्रीन एनर्जीचं (Green Energy) उत्पादन वाढवेल. आपल्याकडे जगातील सर्वात मोठी ग्राहक बाजारपेठ (Consumer Market) आहे. याआधारे जगाच्या अर्थव्यवस्थेत आपलं योगदान 2030 पर्यंत 60 टक्क्यांपर्यंत पोहोचेल." ते म्हणाले, ``भारतात उद्योजकतेच्या भावनेत लक्षणीय वाढ झाली आहे. आता भारताचा औद्योगितदृष्ट्या चांगला काळ सुरू आहे. स्वच्छ आणि ग्रीन एनर्जीमध्ये भारत जगात अग्रेसर ठरेल. रिलायन्स इंडस्ट्रीज भारतात ग्रीन एनर्जीला चालना देण्यासाठी मदत करेल. जीवाश्म इंधनाच्या (Fossil fuels) वापराऐवजी ग्रीन एनर्जीला प्रोत्साहन दिलं जाईल.`` ``भारत सरकार ग्रीन एनर्जीकरिता निधी देण्याबाबत गंभीर पावलं उचलत आहे. भारत जगातील अनेक देशांना स्वच्छ ऊर्जा निर्यात करू शकतो. 2030 मध्ये भारत हा जगातील सर्वांत मोठी तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल,`` असं आशिया इकॉनॉमिक डायलॉगमध्ये बोलताना अंबानी यांनी सांगितलं.
 अंबानी म्हणाले, ``गेल्याकाही वर्षांत जीवाश्म इंधनाचा वापर वाढला आहे. अर्थसंकल्पात (Budget) ग्रीन एनर्जीबाबतही मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. सध्याच्या काळात स्वच्छ ऊर्जा हा पर्याय नसून ती गरज बनली आहे. मी वन्यजीव आणि निसर्गप्रेमी आहे. त्यामुळे निसर्ग आणि प्राण्यांना वाचवण्यासाठी आपण पावलं उचलली पाहिजेत, एवढंच मी एक निसर्गप्रेमी या नात्याने म्हणेन.``
``ग्रीन एनर्जी आपल दैनंदिन आयुष्य अधिक सुलभ करेल. येत्या 20 वर्षांत देशातील तंत्रज्ञान क्षेत्रात सकारात्मक बदल होतील. हवामान बदल हा मानवतेसाठी धोका आहे. आशिया हा जागतिक अर्थव्यवस्थेसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. सध्या डेमोग्राफी आणि डेव्हलमेंटमध्ये चांगला ताळमेळ असल्याचं दिसत आहे,`` असंही अंबानी यांनी स्पष्ट केलं. `कोविड-19 चा जागतिक व्यापार आणि अर्थिक क्षेत्रावरील प्रभाव` या विषयावर आशिया इकॉनॉमिक डायलॉग मध्ये मुख्य चर्चा होईल. यावेळी कोविड-19 चा आशियावर होणारा परिणाम आणि त्याला सामोरे जाण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांवरही चर्चा केली जाईल. या शिखर परिषदेत औद्योगिक क्षेत्रातील बड्या व्यक्तींसह अनेक मोठे जागतिक नेतेही सहभागी होत आहेत.
First published:

Tags: Mukesh ambani, Pune

पुढील बातम्या