Home /News /money /

लॉकडाउनमध्ये 22 वर्षीय तरुणाने सुरू केला बिझनेस, 'शार्क टँक इंडिया'मधून मिळाली लाखोंची गुंतवणूक

लॉकडाउनमध्ये 22 वर्षीय तरुणाने सुरू केला बिझनेस, 'शार्क टँक इंडिया'मधून मिळाली लाखोंची गुंतवणूक

दिल्लीतील कृष्णा नावाचा विद्यार्थी या शोमध्ये पोहोचला होता. त्याची बिझनेस आयडिया (Bussiness Idea) आणि कॉन्फिडन्स पाहून शार्क टँक इंडियाचे जजेसही आश्चर्यचकित झाले.

मुंबई, 23 फेब्रुवारी: शार्क टँक इंडिया (Shark Tank India) या सोनी टीव्हीवरून प्रसारित होणाऱ्या हिंदी रिअॅलिटी टीव्ही शोमध्ये अनेक स्टार्टअप्स प्रेक्षकांची दाद मिळवली आहे. या शोमुळे अनेक तरुणांच्या कल्पनांना शार्क्स (Sharks) अर्थात शोच्या जजेसडून (Show Judges) फंड मिळाला आहे. शोच्या जजेसनी अनेक तरुणांच्या स्टार्टअप्समध्ये मुक्तपणे पैसे गुंतवले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार (Investors) म्हणून ते सध्या नवीन पिढीच्या हृदयावर राज्य करत आहेत. जजेसनी केलेली गुंतवणूक तरुण उद्योपतींना त्यांच्या स्टार्टअप्सला (Startups) आणखी पुढे घेऊन जाण्यास मदत करेल. शार्क टँक इंडियाच्या पहिल्या सीझनमध्ये अनेक जण त्यांच्या कल्पना घेऊन आले होते. त्यापैकी काहींच्या कल्पनांचं मोठ्या प्रमाणात कौतुक झालं. एका एपिसोडमध्ये अशीच एक कल्पना घेऊन दिल्लीतील कृष्णा नावाचा विद्यार्थी पोहोचला होता. त्याची बिझनेस आयडिया (Businesssha Idea) आणि कॉन्फिडन्स पाहून शार्क टँक इंडियाचे जजेसही आश्चर्यचकित झाले. हे वाचा-Shark Tank India : कोणत्या 'शार्क'ची किती स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक? कुणी गुंतवले सर्वाधिक पैसे? शार्क टँक ऑफ इंडियामध्ये आलेल्या 22वर्षीय कृष्णाच्या व्हेंचरचं नाव 'स्नीकेअर' (Sneakare) असं आहे. कृष्णाचा बिझनेस शू केअर इंडस्ट्रीशी (Shoe Care Industry) संबंधित आहे. या कंपनीत त्यानं एकूण 18 लाख रुपये गुंतवले असून त्यापैकी 5 लाख रुपये आई-वडिलांकडून घेतले आहेत. लॉकडाउन (Lockdown) दरम्यान काही मित्रांकडून त्याला शू केअर इंडस्ट्रीबद्दल माहिती मिळाली होती. दोन महिने रिसर्च केल्यानंतर या इंडस्ट्रीमध्ये ग्रोथसाठी (Growth) संधी असल्याचं कृष्णाच्या लक्षात आलं. त्यामुळे त्यानं या इंडस्ट्रीमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला व स्वत:ची शू केअर कंपनी लाँच केली.
कृष्णाच्या मते, 'ज्याप्रमाणे प्रत्येक घराची ओळख त्याच्या टॉयलेट किंवा बाथरूमवरून होते, त्याचप्रमाणं एखाद्या व्यक्तीची ओळख त्याच्या बुटांवरून होते. म्हणूनच शूज महाग असो किंवा स्वस्त त्यांची योग्य पद्धतीनं काळजी घेतली गेली पाहिजे. 'स्नीकेअर'चे बूटबॉक्स (Bootbox) आणि क्लिनिंग अॅक्सेसरीज (Cleaning Accessories) शूजची काळजी घेण्याचं काम करतात.' बीकॉम थर्ड ईयरचा विद्यार्थी असलेल्या कृष्णाच्या आयडियाचा शोच्या जजेसवर खूप प्रभाव पडला. सर्वांनी त्याचं मनापासून कौतुक केलं. कृष्णाच्या आयडियामुळे इम्प्रेस झालेल्या नमिता थापर, विनिता सिंह आणि अमन गुप्ता यांनी एकत्र येऊन कृष्णाच्या कंपनीमध्ये 21 लाख रुपयांची गुंतवणूक केली. हे वाचा-प्रसिद्ध 'Sharks' पैकी या पुण्याच्या उद्योजिका सांभाळतात 6000 कोटींची कंपनी, छोट्या कुटुंबातील लेकीनं गाठलं आभाळ कृष्णाने सांगितलं की, 'स्नीकेअर' हे त्याचं दुसरं स्टार्टअप आहे. जेव्हा तो फक्त 17 वर्षांचा होता, तेव्हाच त्यानं पहिला बिझनेस सुरू केला. कृष्णानं शाळेत 12वीचे फेअरवेल ड्रेसेस (Farewell Dresses) देऊन 10 ते15 हजार रुपयांची पहिली कमाई केली होती. त्यानंतर हळूहळू अनेक शाळांमध्ये त्यानं आपलं हे व्हेंचर नेलं होतं. पण, 2020मध्ये लॉकडाउनमुळे त्याचा हा व्यवसाय बंद पडला होता. दरम्यान, शार्क टँक इंडिया या स्टार्टअपबेस्ड रिअॅलिटी शोचा पहिला सीझन यशस्वीरित्या संपला आहे. या हंगामातील एकूण 35 एपिसोड्समध्ये 67 स्टार्टअप्सला 5.7 दशलक्ष डॉलर्सचं फडिंग मिळालं आहे.
First published:

पुढील बातम्या