मराठी बातम्या /बातम्या /मनी /

31 डिसेंबरआधी 'हे' काम करुन घ्या, अन्यथा सीज होईल बँक अकाऊंट

31 डिसेंबरआधी 'हे' काम करुन घ्या, अन्यथा सीज होईल बँक अकाऊंट

ग्राहकाला KYC (Know Your Customer) अंतर्गत, ग्राहकांना त्यांच्या ओळखीचा आणि पत्त्याचा पुरावा द्यावा लागतो. आर्थिक व्यवहारांसाठी केवायसी आवश्यक आहे. याच्या मदतीने बँक ग्राहकांची अपडेट माहिती घेत असते.

ग्राहकाला KYC (Know Your Customer) अंतर्गत, ग्राहकांना त्यांच्या ओळखीचा आणि पत्त्याचा पुरावा द्यावा लागतो. आर्थिक व्यवहारांसाठी केवायसी आवश्यक आहे. याच्या मदतीने बँक ग्राहकांची अपडेट माहिती घेत असते.

ग्राहकाला KYC (Know Your Customer) अंतर्गत, ग्राहकांना त्यांच्या ओळखीचा आणि पत्त्याचा पुरावा द्यावा लागतो. आर्थिक व्यवहारांसाठी केवायसी आवश्यक आहे. याच्या मदतीने बँक ग्राहकांची अपडेट माहिती घेत असते.

  • Published by:  Pravin Wakchoure
मुंबई, 26 डिसेंबर : नवीन वर्ष (News Year 2022) सुरु व्हायला काही दिवस उरले आहेत. नवीन वर्षात कॅलेंडर बदलण्यासोबतच दैनंदिन जीवनातही अनेक बदल पाहायला मिळणार आहेत. विशेषत: आर्थिक क्षेत्राशी संबंधित अनेक गोष्टी बदलणार आहेत. या बदलांपैकी एक म्हणजे तुमचे बँक खाते (Bank Account) त्वरित अपडेट करणे. आणि विशेषतः KYC अपडेट करा. कारण 1 जानेवारी 2022 रोजी ज्यांचे KYC अपडेट केलेले नाही, त्यांची खाती बँक गोठवू शकते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केवायसीबाबत कठोर पावले उचलण्यास सांगितले आहे. त्यामुळे आता तुमच्याकडे वेळ नाही. जर तुम्ही तुमच्या बँक खात्यात KYC अपडेट केले नसेल, तर हे काम त्वरित पूर्ण करा. अन्यथा, तुम्ही नवीन वर्षात तुमच्या बँक खात्याशी संबंधित कोणतेही व्यवहार करू शकणार नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अशा सर्व खातेदारांवर कठोर कारवाई करणार आहे ज्यांनी 31 डिसेंबर 2021 पर्यंत KYC केले नाही. दर दोन वर्षांनी KYC करणे आवश्यक ग्राहकाला KYC (Know Your Customer) अंतर्गत, ग्राहकांना त्यांच्या ओळखीचा आणि पत्त्याचा पुरावा द्यावा लागतो. आर्थिक व्यवहारांसाठी केवायसी आवश्यक आहे. याच्या मदतीने बँक ग्राहकांची अपडेट माहिती घेत असते. उच्च जोखीम खातेधारकांना दर दोन वर्षांनी केवायसी करावे लागते तर कमी जोखीम खातेधारकांना 10 वर्षातून एकदा केवायसी करावे लागते. बऱ्याच काळापासून निष्क्रिय असलेली बँक खाती पुन्हा सक्रिय करण्यासाठी केवायसी अपडेट करणे देखील आवश्यक आहे. 'या' मल्टीबॅगर स्टॉकमुळ गुंतवणूकदार बनले करोडपती; 97 पैशांचा स्टॉक 194 रुपयांवर RBI मार्गदर्शक तत्त्वे (RBI KYC Guideline) आरबीआयने यावर्षी मे महिन्यात सर्व बँकांना परिपत्रक पाठवले होते. परिपत्रकात, आरबीआयने म्हटले होते की देशाच्या विविध भागांमध्ये प्रचलित कोविड संबंधित निर्बंध लक्षात घेऊन, नियमन केलेल्या संस्थांना सूचित केले जाते की ग्राहकांच्या खात्यांच्या संदर्भात जेथे KYC अपडेट करणे आवश्यक आहे आणि ते प्रलंबित आहे, अशा खात्यावर केवळ या कारणास्तव 31 डिसेंबर 2021 पर्यंत ऑपरेशनवर निर्बंध लादले जातील. मात्र कोणत्याही नियामक/अंमलबजावणी एजन्सी/न्यायालयाच्या निर्देशानुसार निर्बंध लादले जाऊ शकतात. अँटी मनी लाँडरिंग कायद्यांचा भाग KYC अद्ययावत करण्याची गरज केवळ बँकांसाठीच नाही तर प्रत्येक नियमन केलेल्या वित्तीय संस्थेसाठी आहे कारण ते मनी लाँड्रिंग विरोधी कायद्यांचा भाग आहे. या संस्थांमध्ये फायनान्स कंपन्या, म्युच्युअल फंड, ब्रोकिंग हाऊस आणि डिपॉझिटरीज यांचा समावेश आहे. Secured आणि Unsecured क्रेडिट कार्डमध्ये फरक काय? कोणतं कार्ड ठरेल फायदेशीर? KYC साठी आवश्यक कागदपत्रे (KYC Documents List) जर तुम्ही तुमच्या खात्याच्या KYC अपडेटसाठी बँकेत जात असाल, तर पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, नरेगा कार्ड किंवा पॅन कार्ड ही कागदपत्रे तुमच्याजवळ ठेवा. तुम्ही तुमच्या घरुन देखील आरामात ऑनलाइन केवायसी करू शकता.
First published:

Tags: Bank, Investment, Money

पुढील बातम्या