जाहिरात
मराठी बातम्या / मनी / MRF Share Price: एमआरएफचा शेयर 1 लाखांपर्यंत कसा पोहोचला? काय आहे त्यामागील गणित?

MRF Share Price: एमआरएफचा शेयर 1 लाखांपर्यंत कसा पोहोचला? काय आहे त्यामागील गणित?

एमआरएफ शेअर प्राइज

एमआरएफ शेअर प्राइज

MRF Share Price: देशात टायर बनवणारी भारतीय कंपनी एमआरएफने इतिहास रचलाय. MRF च्या शेअरची किंमत एक लाख रुपयांच्या पुढे गेलीये. ही कामगिरी करणारी एमआरएफ ही देशातील पहिली कंपनी आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

MRF Share Price: टायर बनवणाऱ्या MRF एक विक्रम केलाय. एमआरएफच्या एका शेअरची किंमत एक लाख रुपयांच्या पुढे गेली आहे. ही कामगिरी करणारी एमआरएफ ही देशातील पहिली कंपनी ठरली आहे. एक्सपर्टच्या मते, येत्या काही दिवसांमध्ये या शेअर मध्ये आणखी वाढ होऊ शकते. लॉन्ग टर्ममध्ये हा शेअर 1,50,000 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. काही दिवसात हा शेअर 1.15 हजार रुपये आणि दिवाळीपर्यंत 1.25 लाखांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जातेय. रिपोर्टनुसार, देशात किमान 15 स्टॉक्स आहेत जे 10,000 रुपयांच्या वर ट्रेड करत आहेत. बीएसईवर एमआरएफचा शेअर 1.37% वर चढून 52 आठवड्यांच्या नवीन उच्चांकावर 100,300 रुपये प्रति शेयरवर पोहोचला. याआधी मे महिन्यात केवळ 66.50 रुपये कमी असल्याने एमआरएफचा शेअर्स एक लाखाचा आकडा गाठू शकला नव्हता.

News18लोकमत
News18लोकमत

का वाढल्या किंमती? एमआरएफ शेअर्समध्ये तेजी येण्याचे कारण म्हणजे त्याचे शानदार वाल्यूम आहे. तज्ज्ञांच्या मते, एमआरएफ स्टॉकमध्ये सातत्याने वाढ होतेय. कंपनीने गुंतवणूकदारांना चांगला रिटर्न दिलाय. अशा वेळी या शेअरवर गुंतवणूकदारांचा विश्वास वाढलाय. चांगल्या खरेदीमुळे शेअर्समध्ये तेजी आली आहे. MRF भारतातील सर्वाधिक किमतीच्‍या शेअर्सच्या लिस्टमध्ये सर्वात वर आहे. हनीवेल ऑटोमेशन, ज्यांचे शेयर आज 41,152 रुपयांवर व्यवहार करत होते, या लिस्टमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर पेज इंडस्ट्रीज, श्री सिमेंट, 3M इंडिया, अॅबॉट इंडिया, नेस्ले आणि बॉश यांचा क्रमांक लागतो.

Stock Market : शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायला मिनिमम किती वय असावं लागतं?

अशी झाली कंपनीची सुरुवात MRF चे पूर्ण नाव मद्रास रबर फॅक्टरी आहे. त्याची सुरुवात 1946 मध्ये खेळण्यांचे फुगे बनवून झाली. त्यांनी 1960 पासून टायर बनवायला सुरुवात केली. आता ही कंपनी भारतातील सर्वात मोठी टायर उत्पादक कंपनी आहे. भारतातील टायर उद्योगाची बाजारपेठ सुमारे 60000 कोटींची आहे. JK Tyre, CEAT टायर इत्यादी MRF चे स्पर्धक आहेत. MRF चे भारतात 2500 पेक्षा जास्त वितरक आहेत आणि कंपनी जगातील 75 पेक्षा जास्त देशांमध्ये एक्सपोर्ट करते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात