बरेच App वापरण्यासाठी हल्ली वयाची मर्यादा निश्चित करून देण्यात आली आहे. प्रत्येक ठिकाणी नॉमिनी जोडणं आवश्यक आहे. अगदी बँकेत मायनर खातं उघडता येतं, 18 वर्ष पूर्ण झाली की मायनर शब्द काढला जातो. तसं शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी कितव्या वर्षी तुम्ही खातं सुरू करू शकता याचे नियम जाणून घेऊया.
शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी वयाची अट नाही. तुम्ही कोणत्याही वयात शेअर बाजारात गुंतवणूक सुरू करू शकता. स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी डीमॅट खाते आणि ट्रेडिंग खातं असणं गरजेचं आहे.
डीमॅट खाते आणि ट्रेडिंग खाते तयार करण्यासाठी तुमचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. तुमचे डीमॅट आणि ट्रेडिंग खाते उघडण्यासाठी देखील पॅन कार्ड आवश्यक आहे.
18 वर्षांनंतरच्या वयासाठी पॅनकार्ड सहज बनवता येते, जर 18 वर्षांपेक्षा कमी वयाचे पॅनकार्ड बनवायचे असेल तर फक्त पॅन नंबर मिळतो आणि त्यावर अल्पवयीन असं लिहिलेलं असतं.
वय १८ वर्षांपेक्षा कमी असले तरीही डीमॅट आणि ट्रेडिंग खाते उघडणे शक्य आहे. तुम्ही तुमच्या पालकाची कागदपत्रे जमा करून हे करू शकता.
पालकाद्वारे अल्पवयीन व्यक्तीच्या नावाने दलालीमध्ये डीमॅट आणि ट्रेडिंग खाते उघडले जाऊ शकते. सर्व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर, डिपॉझिटरी पार्टिसिपंट तुम्हाला भारतीय स्टॉक एक्सचेंजमध्ये व्यापार करण्याची परवानगी देईल.