मुंबई, 9 जुलै : तुम्ही बाइक किंवा स्कुटर खरेदी करण्याचा प्लॅन करताय? मग बातमी चांगली नाहीय. देशाची सर्वात मोठी टू व्हिलर कंपनी हिरो मोटोकाॅर्प ( Hero Motocorp )नं बाइक आणि स्कुटरच्या किमतीत 1 टक्का वाढ केलीय. याबद्दल हिरो मोटोकाॅर्प कंपनीनं पत्रकही काढलंय. कंपनीनं सांगितलं की वाहनांच्या या वाढीव किमती लगेच लागू केल्या जातील. वेगवेगळ्या टू व्हीलर माॅडेलची शो रूम किंमतीत 1 टक्के वाढ केलीय. माॅडेल आणि बाजाराच्या किमतीत थोडा फरक असू शकतो. कंपनीनं या वाढीचं कारण सांगितलं नाही. पावसाळ्यात सुरू करा ‘हा’ व्यवसाय, रोज 5 ते 10 हजाराची होईल कमाई याआधी महिंद्रा अँड महिंद्रानं वाढवलेली किंमत महिंद्रा अँड महिंद्रा ( M&M )नं आपल्या पॅसेंजर कार्सची किंमत 1 जुलैपासून वाढवली. ही वाढ 36 हजार रुपयांपर्यंत आहे. कंपनीनं यामागचं कारण AIS 145 रेग्युलेशनप्रमाणे सेफ्टी नाॅर्म्स पूर्ण करणं सांगितलं. AIS 145 म्हणजे आॅटोमोटिव्ह इंडस्ट्री स्टॅण्डर्ड 145 प्रमाणे भारतात पॅसेंजर कार्ससाठी सीट बेल्ट वाॅर्निंग, एअरबॅग्ज, स्पीड वाॅर्निंग आणि रिव्हर्स पार्किंग असिस्टसारखे सेफ्टी फीचर्स होणं गरजेचं आहे. टीम इंडियाला ‘हे’ अकरा खेळाडू मिळवून देतील फायनलचे तिकीट ही वाढ झालेल्या कार्समध्ये Scorpio, Bolero, TUV300 आणि KUV100 NXT या कार्सचा समावेश आहे. तर XUV500 आणि Marazzo च्या किमतीत फार वाढ झालेली नाही. अशी आहे सट्टेबाजाराची भविष्यवाणी; भारत आणि रोहित शर्मावर लागलाय इतका भाव! काही दिवसांपूर्वी कार मेकर कंपनी म्हणून ओळख असलेल्या Mahindra & Mahindra कंपनीने आपल्या SUV XUV 500 या नव्या कारचं W3 हे वेरिएंट भारतात लाँच केलं होतं. या कारची एक्स-शोरूम किंमत 12.22 लाख रुपये आहे. हे नवं वेरिएंट देशातील सगळ्या डिलर्सकडे उपलब्ध असल्याचं कंपनीने म्हटलं होतं. VIDEO: फेसबुक प्रेम पडलं महागात; ग्रामस्थांनी दहशतवादी समजून दिला चोप
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.