जाहिरात
मराठी बातम्या / मनी / पावसाळ्यात सुरू करा 'हा' व्यवसाय, रोज 5 ते 10 हजाराची होईल कमाई

पावसाळ्यात सुरू करा 'हा' व्यवसाय, रोज 5 ते 10 हजाराची होईल कमाई

पावसाळ्यात सुरू करा 'हा' व्यवसाय, रोज 5 ते 10 हजाराची होईल कमाई

New Business, Monsoon Business - पावसाळ्यात तुम्ही हा व्यवसाय करून चांगली कमाई करू शकता

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 9 जुलै : पावसाळा तर सुरू झालाय. या मोसमात तुम्हाला एक चांगला व्यवसाय सुरू करायची संधी आहे. या काळत रेनकोट, छत्री, स्कूल बॅग यांना जास्त मागणी असते. तुम्ही या गोष्टींचा व्यवसाय करू शकता. या व्यवसायाची सुरुवात 5 हजार रुपयांनी होते. नंतर हा व्यवसाय वाढू शकतो. त्यात आणखी पैसे गुंतवता येतात. जाणून घेऊ या किती फायदा होऊ शकतो ते- 5 हजार रुपयांनी सुरू करा व्यवसाय रेनकोट, छत्री यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 5 हजार रुपये लागतात. प्रत्येक वस्तूमागे 20-25 टक्के मार्जिन मिळू शकतो. रेनकोट, छत्री, मच्छरदाणी, रबरांचे शूज यांची मागणी पावसात जास्त असते. तुम्ही या वस्तू होलसेल मार्केटमधून खरेदी करून लोकल मार्केटमध्ये विकू शकता. तुम्हाला चांगला नफा होऊ शकतो. तुम्ही या वस्तू थेट त्या बनवणाऱ्यांकडूनही विकत घेऊ शकता. याची माहिती तुम्हाला वेबसाइट्सवर मिळेल. तीन दिवसानंतर स्वस्त झालं पेट्रोल आणि डिझेल, हे आहेत आजचे दर 20-26 टक्के नफा रेनकोट, मच्छरदाणी या वस्तू तुम्ही घरीही बनवू शकता. तुम्हाला शिवणाची आवड असेल तर घरी हे सगळं तयार करणं शक्य आहे. मग हे सामान लोकल मार्केटमध्ये विकलंत तर 20-25 टक्के फायदा आरामात मिळू शकतो. तुम्ही या व्यवसायासाठी 5 हजार रुपयांची गुंतवणूक करू शकता. एका क्लिकवर आता मिळणार घरचं जेवण, Zomato सुरू करतेय ही नवी सेवा BARC मध्ये 47 जागांवर भरती, ‘या’ पदांसाठी करा अर्ज कुठून खरेदी करायचा कच्चा माल? मुंबईत क्राफर्ट मार्केटमध्ये होलसेलमध्ये बऱ्याच गोष्टी मिळतात. दादरलाही अशा बाजारपेठा आहेत. तिथून तुम्ही या वस्तू खरेदी करू शकता. त्या वस्तू विकण्यासाठी तुम्ही सोशल मीडियाचाही वापर करू शकता. तुम्ही घरीही मशीनवर या वस्तू तयार करू शकता. पावसाळा आताच सुरू झालाय. या वस्तू मजबूत आणि जितक्या आकर्षक तितकी विक्की जास्त होऊ शकते. भारताच्या विजयासाठी क्रिकेटप्रेमींकडून प्रार्थना, यासोबत इतर 18 घडामोडींचा आढावा

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात