नवी दिल्ली, 09 जुलै: ICC Cricket World Cupमधील सेमीफायनलच्या सामन्याला आजपासून सुरुवात होणार आहे. पहिल्या सेमीफायनलमध्ये भारत आणि न्यूजीलंड यांच्यात लढत होणार असून दुसरी सेमीफायनल 11 तारखेला ऑस्ट्रेलिया आणि यजमान इंग्लंड यांच्यात होणार आहे. साखळी फेरीतील अटीतटीच्या लढतीनंतर हे 4 संघ बाद फेरीत दाखल झाले. भारत सर्वात अव्वल स्थानी असून त्यापाठोपाठ ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड यांनी बाजी मारली. सेमीफायनलमध्ये कोणते संघ जिंकणार आणि अंतिम सामन्यात कोण बाजी मारणार याचे अंदाज अनेक क्रिकेट चाहते आणि आजी-माजी खेळाडू व्यक्त करत आहेत. यासोबतच क्रिकेटमधील विश्वविजेता कोण होणार याचा अंदाज सट्टा बाजारात देखील लावला जातो. साखळी फेरीत सर्वाधिक सामने जिंकून गुणतक्त्यात अव्वल स्थानी पोहोचलेल्या भारतीय संघ हाच सट्टेबाजारांचे फेव्हरेट संघ आहे. अनेक सट्टेबाजारांच्या मते भारतच विजेतेपदाचा खरा दावेदार आहे. लॅडब्रोक्स आणि बेटवेट सारख्या ऑनलाईन वेबसाईटने भारत अंतिम फेरीत स्थान मिळवले आणि 14 जुलै रोजी लॉर्ड्सवर सामन्यात विजय मिळवत विजेतेपद मिळवले अशी भविष्यवाणी केली आहे. लॅडब्रोक्सने भारताच्या विजयावर 13/8 असा भाव दिला आहे. तर इंग्लंडसाठी 15/8 , ऑस्ट्रेलियाला 11/4 आणि न्यूझीलंडला 8/1 असा भाव दिला आहे. बेटवेटने भारतीय संघ तिसऱ्यांदा विजेता होणार अशी भविष्यवाणी केली आहे. World Cup सेमीफायनलसाठी भारताला मिळाला अलर्ट; घ्यावी लागणार ‘ही’ काळजी! सट्टेबाजाराच्या मते आज (9 जुलै रोजी) होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये भारतच विजयाचा दावेदार आहे. भारताची फलंदाजी आणि गोलंदाजी शानदार आहे. ओपनर रोहित शर्माने आतापर्यंत 5 शतके झळकावली आहेत. त्याने स्पर्धेत 647 धावा केल्या आहेत. तर गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि हार्दिक पांड्या हे देखील अचूक गोलंदाजी करत आहेत. World Cup: हिटमॅन रोहित विश्व विक्रमाच्या उंबरठ्यावर; आज मोडणार हे 3 विक्रम! कसा ठरतो भाव… जर एखाद्या व्यक्तीने 13/8 भाव असलेल्या संघावर पैसे लावले तर त्याचा अर्थ असा असतो की जितके पैसे लावण्यात आले आहेत त्या रक्कमेला 13ने गुणले जाते आमि मग 8 ने भागाकार केला जातो. ही आकडेमोड झाल्यानंतर जी रक्कम येते ती संबंधित सट्टा लावणाऱ्या व्यक्तीला दिली जाते. लॅडब्रोक्सच्या मते स्पर्धेत सर्वाधिक धावा कोण करणार यासाठी रोहित शर्मावर 8/13 असा भाव लागला आहे. तर ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरवर 11/8, इंग्लंडच्या जो रुटवर 20/1 असा भाव लागला आहे. भारताच्या विजयासाठी क्रिकेटप्रेमींकडून प्रार्थना, यासोबत इतर 18 घडामोडींचा आढावा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.