मराठी बातम्या /बातम्या /मनी /

वर्षभरात 'हा' शेअर 16 टक्के वाढणार, MOTILAL OSWAL चा अंदाज; तुमच्याकडे आहे का?

वर्षभरात 'हा' शेअर 16 टक्के वाढणार, MOTILAL OSWAL चा अंदाज; तुमच्याकडे आहे का?

Endurance Technologies चा शेअर सध्या 1816 रुपयांच्या आसपास ट्रेड करताना दिसत आहे. मोतीलाल ओसवाल यांना विश्वास आहे की पुढील 12 महिन्यांत हा स्टॉक 16 टक्क्यांहून अधिक वाढीसह 2100 रुपयांची पातळी दाखवू शकतो.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 15 नोव्हेंबर : शेअर बाजारात गुंतवणूक (Share market Investment) करताना चांगले शेअर शोधून त्यात गुंतवणूक करणे महत्त्वाचे असते. त्यामुळे अनेक गुंतवणूकदार अनेक तज्ज्ञांचे सल्ले ऐकतात. मोतीलाल ओसवालने (Motilal Oswal) Endurance Technologies कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे. मोतीलाल ओसवाल यांचा अंदाज आहे की Endurance Technologies चे शेअर 1 वर्षात 16 टक्के परतावा देतील.

Endurance Technologies चा शेअर सध्या 1816 रुपयांच्या आसपास ट्रेड करताना दिसत आहे. मोतीलाल ओसवाल यांना विश्वास आहे की पुढील 12 महिन्यांत हा स्टॉक 16 टक्क्यांहून अधिक वाढीसह 2100 रुपयांची पातळी दाखवू शकतो. आर्थिक वर्ष 2022 च्या दुसऱ्या तिमाहीतील Endurance Technologies ची कामगिरी पाहता, कच्च्या मालाच्या किमतीत वाढ आणि सेमीकंडक्टरची कमतरता यामुळे कंपनीवर परिणाम दिसून आला आहे.

Sigachi Industries ची शेअर बाजारात दमदार एन्ट्री; शेअर 575 रुपयांवर लिस्ट

दुसऱ्या तिमाहीत कंपनीची कमाई वार्षिक आधारावर 8 टक्क्यांनी वाढली, तर तिमाही आधारावर ती 11 टक्क्यांनी वाढली. दुसरीकडे, EBITDA वार्षिक आधारावर 9 टक्क्यांनी घसरला आणि तिमाही आधारावर 6 टक्क्यांनी वाढला. दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा EBITDA 2.6 अब्ज रुपये होता. दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा Adjusted PAT वार्षिक आधारावर 8 टक्क्यांनी घसरला, तर तिमाही आधारावर तो 11 टक्क्यांनी वाढला आणि 1.3 अब्ज रुपये राहिला.

फक्त 53 हजार रुपयांमध्ये सुरू करा 'हा' व्यवसाय आणि कमवा 35 लाख रुपये!

Endurance Technologies मध्ये सुमारे 27 प्रोडक्शन युनिट्स आहेत. कंपनी 3 देशांमध्ये 27 प्लान्ट्समध्ये उत्पादन करते आणि 28 पेक्षा जास्त देशांमध्ये निर्यात करते. आज सकाळी 10.50 वाजता NSE वर Endurance Technologies चा शेअर 39.30 किंवा (-2.16%) च्या घसरणीसह 1777.45 च्या पातळीवर दिसत आहे. तर BSE वर हा स्टॉक 39.25 म्हणजेच 2.16 टक्के घसरुन 1777 च्या पातळीवर ट्रेड करत आहे.

First published:

Tags: Investment, Money, Share market