जाहिरात
मराठी बातम्या / मनी / केवळ 1 रुपयात कुठे आणि कसं खरेदी कराल 24 कॅरेट सोने, वाचा सविस्तर

केवळ 1 रुपयात कुठे आणि कसं खरेदी कराल 24 कॅरेट सोने, वाचा सविस्तर

केवळ 1 रुपयात कुठे आणि कसं खरेदी कराल 24 कॅरेट सोने, वाचा सविस्तर

रुपयात जर सोनं खरेदी करता येईल तर अनेकाना आंनद होईल. देशातील Paytm सह अनेक ई-वॉलेट कंपन्या आता एक रुपयात सोने खरेदीची संधी देत आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 23 जुलै : सोनखरेदीला भारतीयांच्या आयुष्यात एक महत्वाचे स्थान आहे. त्यामुळे 1 रुपयात जर सोनं खरेदी करता येईल तर अनेकाना आंनद होईल. देशातील Paytm सह अनेक ई-वॉलेट कंपन्या आता एक रुपयात सोने खरेदीची संधी देत आहेत. या प्लॅटफॉर्मवर विकले जाणारे सोने 24 कॅरेट 99.9 टक्के शुद्धतेचं सोन आहे. याठिकाणी तुम्ही खरेदी केलेलं सोने एका सुरक्षित लॉकरमध्ये ठेवले जाते. तुम्हाला जेव्हा हवं तेव्हा या सोन्याची डिलिव्हरी तुम्ही घेऊ शकता. तज्ज्ञांच्या मते तुम्ही एक रुपयापासून गुंतवणूक करून हळूहळू ही रक्कम वाढवू शकता. त्याचप्रमाणे जेव्हा गरज भासेल तेव्हा सोने किंवा चांगला रिटर्न देखील मिळवू शकता कुठे आणि कसे खरेदी कराल 1 रुपयात 24 कॅरेट सोने? पेटीएम गोल्डवरून सोने खरेदी करण्यासाठी तुम्हाला पेटीएम अ‍ॅपवर गोल्डच्या पर्यायवर क्लिक करावे लागेल. याठिकाणी तुम्ही सोने खरेदी करू शकता. तुमचे सोने MMTC-PAMP च्या लॉकरमध्ये सुरक्षित राहिल. खरेदीबरोबरच इथे सोने तुम्ही विकू देखील शकता. पेटीएम गोल्डवर कसे खरेदी करतात सोने? तुम्ही पेटीएमचे डिजिटल गोल्ड खरेदी करू शकता. 0.0005 ग्रॅमपासून जास्तीत जास्त 5 तोळे सोने खरेदी करता येईल. महत्त्वाची बाब म्हणजे 0.0005 ग्रॅम सोने 1 रुपयात खरेदी करता येईल. (हे वाचा- सोन्याचांदीच्या दरांनी गाठला उच्चांक! चांदी पहिल्यांदा 61 हजारांच्या वर ) यामध्ये कर वगैरे अन्य शुल्काचा समावेश नाही आहे. याप्रकारे सोनेखरेदीचा विचार करत असाल तर तुम्ही पेटीएमच्या App किंवा वेबसाइटवर जाऊन यासंदर्भातील सर्व अटींची माहिती घेऊ शकता. कंपनीचा असा दावा आहे की याठिकाणी विकले जाणारे सोने 24 कॅरेट 99.9 टक्के शुद्धतेचे सोने आहे. हे सोने तुम्ही पेटीएमच्या डिजिटल लॉकररमध्ये ठेवू शकता आणखी कुठे एक रुपयात सोने खरेदी करता येते? PhonePe देखील यापद्धतीने 1 रुपयात सोने खरेदीची संधी देते. हे सोने देखील तुम्ही विकू शकता. दरम्यान सोने विकण्यासाठी त्या व्यक्तीकडे कमीतकमी  5 रुपयांचे सोने असणे आवश्यक आहे. हे एका दिवसात खरेदी आणि विकले जाऊ शकते. PhonePe App वर यासंदर्भात सविस्तर माहिती तुम्हाला मिळू शकते. MMTC-PAMP जगभरातील सर्वात आधीच्या गोल्ड अकाउंट्सपैकी एक आहे, जे डिजिटली अ‍ॅक्सेस करता येते. (हे वाचा- लॉकडाऊन संपताना वाढतेय नोकरीची संधी, ‘या’ क्षेत्रात मिळणार बम्पर जॉब्स ) यामध्ये ग्राहक 99.9 शुद्ध सर्टिफाइड सोने 1 रुपयात खरेदी करू शकतात, विकू शकतात त्याचप्रमाणे रिडीम किंवा ट्रान्सफर करू शकतात. MMTC-PAMP ग्राहकांना छोट्या स्तरावर सोने खरेदी आणि जमा करण्याचा पर्याय उपलब्ध करून देते. याकरता फिजिकल डिलिव्हरीसाठी नंतर रिक्वेस्ट करता येते. ही सेवा डिजिटल प्लॅटफॉर्म पेटीएम, गुगल पे, Fisdom याचप्रमाणे मोतीलाल ओस्वाल आणि एचडीएफसी बँक सिक्यूरिटीज या वित्तसंस्थांमध्ये उपलब्ध आहे. हे सोने विकता येईल का? पेटीएमवर खरेदी केलेले सोने विकण्यासाठी पेटीएम अ‍ॅपवर जाऊन ‘गोल्ड’ पर्याय निवडा. याठिकाणी जाऊन ‘सेल’ वर क्लिक करा. रक्कम आणि किती प्रमाणात सोने विकायचे आहे याच्या आधारावर ही विक्री केली जाते. म्हणजेच तुम्हाला 1 रुपयाचे सोने विकायचे आहे की 0.1 ग्रॅमचे. तुमचा पर्याय निवडा आणि सेल ट्रान्झॅक्शनसाठी तुमच्या बँकेचा खातेनंबर आणि IFSC कोड तिथे टाका. IMPS शुल्क 10 रुपये द्यावे लागेल. यानंतर सोने विक्रीची रक्कम तुमच्या खात्यामध्ये पुढील 48 तासात जमा होईल. हा व्यवहार किती सुरक्षित? कंपनीने असा दावा केला आहे की, या प्लॅटफॉर्मवर विकले जाणारे सोने  24 कॅरेट 99.9 शुद्धतेचे आहे. तुम्ही खरेदी केलेले सोने एका सुरक्षित लॉकरमध्ये ठेवले जाते. या सोन्याची होम डिलिव्हरी देखील तुम्ही घेऊ शकता. कधीही डिलिव्हरी होऊ शकते का? तुम्ही 1 ग्रॅमपर्यंत सोने खरेदी केल्यानंर त्याची डिलिव्हरी घेता येते. डिलिव्हरी 1, 2, 5, 10, 20 ग्रॅमच्या नाण्यांमध्ये होते. त्याचप्रमाणे पेटीएम त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून डिजिटल व्यवहार केल्यानंतर कॅशबॅकच्या रुपात डिजिटल गोल्ड खरेदीचा पर्याय देखील देते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात