मराठी बातम्या /बातम्या /मनी /'या' शेअरमध्ये गुंतवलेले पैसे सहा महिन्यात दुप्पट; तेजी कायम राहण्याचा ब्रोकरेज फर्मचा दावा

'या' शेअरमध्ये गुंतवलेले पैसे सहा महिन्यात दुप्पट; तेजी कायम राहण्याचा ब्रोकरेज फर्मचा दावा

Stove Kraft स्टॉकवर नजर टाकली तर गेल्या वर्षभरात स्टॉकमध्ये 132.64 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. तर मागील सहा महिन्यात शेअरने गुंतवणूकदारांना 109.71 टक्के रिटर्न दिले आहेत.

Stove Kraft स्टॉकवर नजर टाकली तर गेल्या वर्षभरात स्टॉकमध्ये 132.64 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. तर मागील सहा महिन्यात शेअरने गुंतवणूकदारांना 109.71 टक्के रिटर्न दिले आहेत.

Stove Kraft स्टॉकवर नजर टाकली तर गेल्या वर्षभरात स्टॉकमध्ये 132.64 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. तर मागील सहा महिन्यात शेअरने गुंतवणूकदारांना 109.71 टक्के रिटर्न दिले आहेत.

मुंबई, 8 नोव्हेंबर : आपण गुंतवलेले पैसे दुप्पट झालेले कुणाला आवडणार नाही आणि तेही सहा महिन्यात. शेअर मार्केटमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात कमी वेळेत रिटर्न मिळतात. स्टोव्ह क्राफ्टच्या (Stove Kraft Share) शेअरने यावर्षी आतापर्यंत मल्टीबॅगर रिटर्न (Multibagger Returns) दिले आहे. कारण 2021 मध्ये स्टॉक 132 टक्क्यांपेक्षा जास्त वाढला आहे. तर हा मल्टीबॅगर स्टॉक गेल्या 6 महिन्यांत 110 टक्क्यांपेक्षा जास्त वाढला आहे. स्टोव्ह क्राफ्ट लिमिटेड (SKL) स्वयंपाकघर आणि गृहोपयोगी उत्पादनांच्या निर्मिती आणि विक्रीच्या व्यवसाय करणारी कंपनी आहे.

Stowe Craft Ltd. ने 2QFY22 मधील वार्षिक महसूल उत्पन्न 53 टक्के नोंदवलं आहे. एबीपी न्यूजच्या वृत्तानुसार या शेअरमधील वाढ आगामी काळातही कायम राहील असं ब्रोकरेज फर्म निर्मल बांगने सांगितले आहे. ब्रोकरेज फर्मने म्हटलं की, “गेल्या 7 वर्षांत SKL ची वेगाने वाढ झाली आहे. 1200 रुपये प्रति शेअरच्या सुधारित टार्गेट प्राईजसह स्टॉकवर आपले BUY रेटिंग कायम ठेवले आहे.

आता EMI वरही काढता येणार विमानाचं तिकीट, Spicejet ची खास सुविधा

निर्मल बंग यांच्या मते, 1HFY22 मध्ये, कंपनीने 11,400 पेक्षा जास्त किरकोळ दुकाने जोडली आहेत. याशिवाय, एलईडी लाइटिंग/प्लास्टिक स्टोरेज कंटेनर्स/इलेक्ट्रिक केटल्स यापुढेही सर्वांगीण विकासाला मदत करत राहतील.

विना Internet ही करता येईल UPI Payment, पाहा काय आहे सोपी पद्धत

स्टॉकवर नजर टाकली तर गेल्या वर्षभरात स्टॉकमध्ये 132.64 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. तर मागील सहा महिन्यात शेअरने गुंतवणूकदारांना 109.71 टक्के रिटर्न दिले आहेत. म्हणजेच 10 मे रोजी हा शेअर 494.70 रुपयांना होता जो आज 1037.45 रुपयांवर ट्रेड करत आहे. त्यामुळे एखाद्या गुंतवणूकदारांने सहा महिन्यांपूर्वी या शेअरमध्ये गुंतवणूक केली असती त्याची गुंतवणूक दुप्पट झाली असती.

(Disclaimer:बाजारातील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीच्या अधीन असते. गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा. News18Lokmat.com कोणालाही गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही.)

First published:
top videos

    Tags: Investment, Money, Share market