मुंबई, 10 सप्टेंबर : सप्टेंबर महिन्यापासून पैसे देवाण-घेवाणीचे नियम बदललेत. आता एका मर्यादेच्या पुढे जाऊन पैसे काढले तर 2 टक्के TDS कापला जातो. म्हणून आज आम्ही तुम्हाला पैशाच्या देवाण-घेवाणीचे नियम सांगतोय.
1. कर्ज रकमेच्या स्वरूपात घेतलं तर काय होईल? - कर्जाची रक्कम कोणी सरळ तुमच्या बँक खात्यात पाठवली तर ती 20 हजारापर्यंतच पाठवू शकतो. त्याहून जास्त कर्ज रकमेच्या स्वरूपात घेतलं तर 100 टक्के दंड आहे. तुम्ही डोनेशन पैशाच्या स्वरूपात देत असाल तर 2000 रुपयापर्यंतच देऊ शकता. त्याहून जास्तत दिलंत तर 80G मधून सूट मिळणार नाही.
14 दिवसांनी वाढल्या पेट्रोल-डिझेलच्या किमती, 'हे' आहेत आजचे दर
2. घरी कॅश ठेवण्याची मर्यादा काय? - टॅक्स एक्सपर्ट सांगतात की, घरात पैसे किती ठेवायचे याबद्दल काही नियम नाहीत. पण घरातल्या पैशांचा सोर्स काय हे तुम्ही सांगू शकला नाहीत तर 137 टक्के दंड होईल.
3. बँकेत पैसे ठेवण्याचे आणि जमा करण्याचे नियम काय आहेत? - तुम्ही 1 कोटीपेक्षा जास्त पैसे काढलेत, तर तुम्हाला 2 टक्के TDS द्यावा लागेल. बँकेत किती पैसे ठेवायचे याला काही मर्यादा नाहीत. नियम डिपाॅझिट रकमेच्या माहिती देण्याबद्दल आहे.
सावधान, 24 सप्टेंबरला तुमच्या PF बद्दल होऊ शकतो मोठा निर्णय
4. प्राॅपर्टी विकल्यानंतर मिळणाऱ्या पैशाबद्दल काय नियम आहे? - प्राॅपर्टी विकतानाही तुम्ही रक्कम किती घेऊ शकता, याचे नियम ठरलेत. तुम्ही 20 हजार रुपये कॅश घेऊ-देऊ शकता. त्याहून जास्त रकमेवर दंड बसेल.
5. किती कॅश पेमेंट करू शकता? - कॅश पेमेंटची काही सीमा नाहीय. खासगी खर्चासाठी तुम्ही 2 लाख रुपयांपर्यंत कॅश देऊ शकता. पण व्यवसायासाठी 10 हजार रुपयापर्यंत कॅश लिमिट आहे.
'इथे' फक्त 100 रुपयांत उघडा खातं, बँकेपेक्षा जास्त मिळेल व्याज
6. लग्नाच्या खर्चासाठी रकमेबद्दल नियम - टॅक्स एक्सपर्ट गौरी चढ्डा सांगतात, एका व्यक्तीनं 2 लाखांपेक्षा जास्त खरेदी केली तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे तुमचं नाव जाईल. गरज वाटली तर तुमची चौकशी होऊ शकते. तुम्ही योग्य उत्तरं दिली नाहीत तर 78 टक्के टॅक्स आणि व्याज द्यावं लागेल.
VIDEO: ऐक्य असावं तर असं! गणपती आणि मोहरम पीर यांची एकत्र मिरवणूक