मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Wedding in Space : आता थेट अवकाशातच बांधा लग्नगाठ; अंतराळातही करता येणार विवाह सोहळा

Wedding in Space : आता थेट अवकाशातच बांधा लग्नगाठ; अंतराळातही करता येणार विवाह सोहळा

अंतराळात लग्न करण्यासाठी (Wedding in Space) आतापासून बुकिंग सुरू झालं आहे.

अंतराळात लग्न करण्यासाठी (Wedding in Space) आतापासून बुकिंग सुरू झालं आहे.

अंतराळात लग्न करण्यासाठी (Wedding in Space) आतापासून बुकिंग सुरू झालं आहे.

वॉशिंग्टन, 28 जुलै : साधारणपणे लग्न (Wedding) आयुष्यात एकदाच होतं. त्यामुळे आपलं लग्न अविस्मरणीय असावं असाच सगळ्यांचा प्रयत्न असतो. कित्येक लोक मग यासाठी अगदीच हटके पद्धतीनेही लग्न करतात. कुणी डेस्टिनेशन वेडिंग करतं, कुणी पाण्यात तर कुणी एअर बलूनमध्ये लग्न करतं. काही दिवसांपूर्वी तर एका व्यक्तीने विमानात लग्न केल्याचंही समोर आलं होतं. पण आता तर फक्त पृथ्वीवरच नाही तर तुम्हाला अवकाशातही लग्न (Wedding in Space) करता येणार आहे.

फ्लोरिडामधील स्पेस पर्स्पेक्टिव्ह (Space Perspective Florida) ही कंपनी अंतराळात लग्न करण्याची सुविधा देणार आहे. ही कंपनी फुटबॉल स्टेडियमच्या आकाराचं एक स्पेस कॅप्सूल अवकाशात सोडणार आहे. हे कॅप्सूल जमिनीपासून एक लाख फूट (19 मैल) उंचीवर तरंगत असणार आहे. या कॅप्सुलसाठी स्पेस बलूनचा वापर केला जाईल. सध्या ही कंपनी या ठिकाणी जाण्यासाठी एक लाख 25 हजार डॉलर्स म्हणजेच सुमारे एक कोटी रुपये तिकीट आकारत आहे (Space Perspective capsule price).

हे वाचा - काहीही! नवऱ्याला मंडपातच नवरीला द्यावी लागते इनरविअर; लग्नाची विचित्र परंपरा

या कॅप्सुलमध्ये एक बाथरुम, एक बार आणि वाय-फाय इंटरनेट अशा सुविधा उपलब्ध आहेत. सध्या एका वेळी केवळ आठ लोक या ठिकाणी जाऊ शकतात. एकदा पैसे भरल्यानंतर सहा तासांसाठी प्रवासी या कॅप्सुलमध्ये राहू शकतात. लग्नासोबतच कॉर्पोरेट मीटिंग, वाढदिवस (Birthday in space) अशा गोष्टीही करण्यासाठी तुम्ही हे कॅप्सुल बुक करू शकता असं कंपनीने म्हटलं आहे.

हे कॅप्सूल पर्यावरणपूरक (Zero emission) असणार आहे. हे कॅप्सूल वर जाताना आतील प्रवासी सुमारे 450 मैल दूरपर्यंतचा परिसर पाहू शकणार आहेत.  यातून पृथ्वीचं विलोभनीय दृष्य पाहण्याचा आनंद प्रवासी घेऊ शकतात.  सुमारे दोन तासांमध्ये हे कॅप्सूल 30 किलोमीटर उंचीवर पोहोचतं. यातून संपूर्ण फ्लोरिडा, बहामा आयलँड्स आणि मेक्सिकोपर्यंतचं दृष्य पाहू शकाल, असा दावा कंपनीने केला आहे.

हे वाचा - ज्याच्याशी ब्रेकअप केलं त्याने Tokyo Olympic मेडल जिंकलं; तरुणीला होतोय पश्चाताप

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, आताच 2024 साठी सर्व कॅप्सुल बुक झाली आहेत. पण 2025 साठी अजूनही बुकिंग सुरू असल्याचंही कंपनीने स्पष्ट केलं आहे. फ्लोरिडामधील टॅबर मॅक्क्युलम आणि जेन पॉयन्टर हे दाम्पत्य या कंपनीची धुरा सांभाळत आहे. या वर्षी जूनमध्येच कंपनीचे टेस्ट व्हेईकल ‘नेपच्युन-1 ‘ हे नासाच्या केनेडी स्पेस सेंटरशेजारील स्पेसपोर्ट या स्पेस कोस्टवरुन यशस्वीपणे लाँच झालं होतं.

First published:

Tags: Couple, Lifestyle, Space, Wedding