मराठी बातम्या /बातम्या /मनी /

काय आहे YouTube Shorts?; यातून महिन्याला होऊ शकते लाखोंची कमाई!

काय आहे YouTube Shorts?; यातून महिन्याला होऊ शकते लाखोंची कमाई!

तसंच, युजर्स YouTube Subscription ही घेऊ शकतात. त्यामुळे युजर्सला जाहिराती यूट्यूब व्हिडीओमध्ये जाहिराती दिसणार नाहीत.

तसंच, युजर्स YouTube Subscription ही घेऊ शकतात. त्यामुळे युजर्सला जाहिराती यूट्यूब व्हिडीओमध्ये जाहिराती दिसणार नाहीत.

लॉकडाऊनमध्ये अनेकांचे रोजगार आणि नोकऱ्या अडचणीत आल्या आहेत. अशा स्थितीत कमाईसाठी ऑनलाइन (Online) स्रोत शोधण्याकडे अनेकांचा कल आहे.

मुंबई, 5 ऑगस्ट: सोशल मीडिया (Social Media) हे जसं मत, भावना व्यक्त करण्याचं आणि कोणत्याही गोष्टीवर भाष्य करण्याचं माध्यम आहे, तसंच ते आता कमाईचं (Earning) साधन देखील होऊ शकतं. त्यात युट्युब हे अत्यंत लोकप्रिय माध्यम आहे. चित्रपट, संगीत, माहितीपट किंवा अगदी हलकेफुलके व्हिडीओ (Video) या साइटवर पाहायला मिळतात. आता युट्युबचाच एक भाग असलेल्या युट्युब शॉर्टसच्या माध्यमातून तुम्ही मनोरंजनासोबत पैसेही कमवू शकता. जाणून घेऊया कमाईच्या या माध्यमाविषयी सविस्तर...

सध्या कोरोना काळात (Corona) अर्थव्यवस्थेसह सर्वच घटकांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. अनेकांचे रोजगार आणि नोकऱ्या अडचणीत आल्या आहेत. अशा स्थितीत कमाईसाठी ऑनलाइन (Online) स्रोत शोधण्याकडे अनेकांचा कल आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून कमाईची संधी अनेकांनी शोधली देखील आहे. याचाच एक भाग म्हणून युट्युब कंटेट क्रिएटर्स आता तुम्हाला अधिक पैसे कमवण्याची संधी देत आहेत. यासाठी युट्युबने 2021 आणि 2022 साठी 100 दशलक्ष रुपयांच्या निधीची घोषणा केली आहे. हा निधी युट्युब शॉर्टसच्या (Youtube Shorts) कंटेट क्रिएटर्सला (Content Creators) दिला जाणार आहे. तुम्ही जर कंटेट क्रिएटर्स असाल तर तुम्ही देखील यातून पैसे कमवू शकता.

(हे वाचा:हा हिट फॉर्म्यूला वापरुन करा भरघोस कमाई! केवळ 5000 रुपये गुंतवून मिळवा 50000  )

भारतात टिकटॉक बंद झाल्यानंतर त्याचा फायदा इन्स्टाग्राम (Instagram) आणि युट्युबने घेतला. युट्युबने टिकटॉकप्रमाणे (TikTok) असणारे शॉर्टस तर इन्स्टाग्रामने रिल्स (Reels) सादर केले. युट्य़ुब शॉर्टसवर तुम्ही 60 सेकंदापर्यंत कालावधी असलेला व्हिडीओ अपलोड करु शकता. या व्हिडिओच्या परफॉर्मन्सवर तुम्हाला पेमेंट मिळू शकणार आहे. युट्य़ुब शॉर्टसवर कंटेट तयार करण्यासाठी कंपनी तुम्हाला 100 डॉलर ते 10,000 डॉलरपर्यंत रक्कम देऊ शकते, असं आज तकने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

(हे वाचा: रक्षाबंधनाच्या आधी सुरु करा हा व्यवसाय; एका दिवसात होईल1लाखाची कमाई!)

युट्युब शॉर्टसवर तुम्ही कमी कालवधीचे आणि आकर्षक व्हिडीओ तयार करु शकता. यासाठी किमान लेंथ 15 सेंकद तर कमाल लेंथ 60 सेकंद अशी ठेवण्यात आली आहे. हा व्हिडीओ व्हर्टिकल आणि 9/16 या फॉरमॅटमध्ये असावा. त्यानंतर तुम्हाला युटयुब शॉर्टस तयार करण्यासाठी प्लस (+) वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला शॉर्टससाठीचा ऑप्शन सिलेक्ट करावा लागेल. शॉर्टसवर व्हिडीओ अपलोड झाल्यानंतर काही इनबिल्ट फिचर्सच्या (Inbuilt Features) मदतीनं तुम्ही तो एडिट करु शकता. त्याला म्युझिकची जोड देऊ शकता तसेच व्हिडीओचा स्पीड बदलू शकता. इन-ॲप एडिटींग (In-app Editing) झाल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट बटणावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला टायटल, डिस्क्रिप्शन, थंबनेल तसेच अन्य डिटेल्स भरावे लागतील. यानंतर तुम्ही अपलोड बटणावर क्लिक करावे. अशा पध्दतीनं तुमचा शॉर्टस व्हिडिओ तयार होईल. मॉनिटायझेशन क्राइटेरिया पूर्ण झाल्यास तुम्हाला परफॉर्मन्सच्या आधारे आकर्षक पेमेंट मिळेल. विशेष म्हणजे तुमच्या कला-कौशल्याच्या आधारे तुम्ही आधिकाधिक कमाई या माध्यमातून करु शकता.

First published:

Tags: Money, Youtube