जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Business Idea: फक्त 5 हजारात सुरु करा हा सुपरहिट बिझनेस, होईल भरपूर कमाई!

Business Idea: फक्त 5 हजारात सुरु करा हा सुपरहिट बिझनेस, होईल भरपूर कमाई!

बिझनेस आयडिया

बिझनेस आयडिया

Mobile Accessories Business: मोबाईल अॅक्सेसरीजचा व्यवसाय तुमच्यासाठी खूप फायदेशीर व्यवसाय ठरु शकतो. तुम्ही हा बिझनेस फक्त 5,000 रुपये खर्चून सुरू करू शकता.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

Mobile Accessories Business: सध्याच्या काळात अनेक असे लोक आहेत जे आपल्या नोकरीमुळे त्रस्त झाले आहेत आणि त्यांना कोणता ना कोणता बिझनेस सुरु करायचा आहे. तुम्हीही अशाच एखाद्या बिझनेसच्या शोधात असाल ज्यामध्ये कमी गुंतवणुकीत चांगला पैसा कमावता येईल. तर आज आम्ही तुम्हाला एक खास बिझनेस आयडिया देणार आहोत. आज आम्ही तुम्हाला मोबाईल एक्सेसरीज बिझनेसविषयी माहिती देणार आहोत.

News18लोकमत
News18लोकमत

वाढत्या डिजिटलायझेशनमुळे स्मार्टफोनचा वापर झपाट्याने वाढला आहे. अशा वेळी चार्जर, इअरफोन, पंखा, लाईट, विविध प्रकारच्या केबल, लाइटिंग स्पीकर, मोबाईल स्टँड, कार्ड रीडर, साउंडबार स्पीकर आदी मोबाईल अ‍ॅक्सेसरीजला मोठी मागणी आहे. तुम्ही आता हा व्यवसाय सुरू केल्यास, तुम्ही लगेच बंपर कमाई सुरू करू शकता. या बिझनेसची खास गोष्ट म्हणजे हा बिझनेस कोणत्याही सिझमध्ये चालतो. अशा परिस्थितीत ते तुम्हाला वर्षाच्या 12 महिन्यांसाठी नफा देऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया या बिझनेसविषयी सविस्तर… Business Idea: 25 रुपयांचे होतील शेडको रुपये! फक्त हजार रुपयात घरीच सुरु करा हा बिझनेस, सरकारही करेल मदत! मोबाईल अ‍ॅक्सेसरीजचा बिझनेस कसा सुरू करायचा? हा व्यवसाय सुरू करताना, आजकाल कोणत्या अ‍ॅक्सेसरीज जास्त ट्रेंडमध्ये आहेत ते शोधा. त्यानंतरच वस्तू खरेदी करा. एकाच वेळी अनेक वस्तू खरेदी करू नका. वेगवेगळ्या कॅटेगिरीच्या वस्तू खरेदी केल्यास त्याचा फायदा ग्राहकांना होईल. त्यांना कॅटेगिरीमधील वस्तू पाहायला मिळतील. अशा वेळी, या सर्व वस्तूंपैकी ग्राहक एक तरी वस्तू खरेदी करेलच. तुम्‍हाला हवं असल्‍यास तुम्‍ही सार्वजनिक ठिकाणी छोटासा स्‍टॉल लावून किंवा सार्वजनिक परिसरात फिरून हा बिझनेस करू शकता. Business Idea:‘हा’ बिझनेस करुन होता येईल मालमाल! औषधींपासून सौंदर्य प्रसाधानासाठी आहे उपयोगी मोबाईल अ‍ॅक्सेसरीजमधून कमाई हा असा व्यवसाय आहे, जो पार्ट टाइम किंवा फुल टाइम करता येतो. या व्यवसायात खर्चाच्या 4-5 पट नफा सहज मिळतो. समजा तुम्ही एखादी वस्तू 12 रुपयांना विकत घेतली असेल तर तुम्ही ती वस्तू 50 रुपयांना सहज विकू शकता. ग्राहकही ते आनंदाने खरेदी करतील. याशिवाय या व्यवसायाचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला हवे असल्यास सुरुवातीला 5 हजार रुपये गुंतवून तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात