नवी दिल्ली, 30 जून : तुम्हाला जॉब करुन कंटाळा आलाय? बिझनेस सुरु करण्याची इच्छा असेल तर आज आम्ही तुम्हाला शानदार बिझनेस आयडिया देणार आहोत. हा एक असा बिझनेस आहे ज्यामध्ये तुम्हाला भरघोस कमाई करण्याची संधी मिळेल. एलोवेराची मागणी अनेक दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. याचा वापर कॉस्मेटिक प्रोडक्ट आणि आयुर्वेदिक औषधींमध्ये केला जातो. अशा वेळी तुम्ही एलोवेरा जेलच्या मॅन्यूफॅक्चरिंग यूनिट उभारुन शानदार कमाई करु शकता. एलोवेरा जेल उन्हात सन बर्नपासून बचाव करते. यासोबतच वेदनांमध्ये खूप फायदेशीर मानले जाते. कोरफडचे अनेक प्रोडक्ट्स सध्या बाजारात उपलब्ध आहेत. आपली त्वचा नितळ आणि टवटवीत राहावी यासाठी लोक याचा वापर करतात. अशा परिस्थितीत, तुम्ही एलोवेरा युनिट स्थापन करून भरपूर नफा कमवू शकता. Business Idea: 25 रुपयांचे होतील शेडको रुपये! फक्त हजार रुपयात घरीच सुरु करा हा बिझनेस, सरकारही करेल मदत! या गोष्टींसाठी होतो वापर एलोवेरा जेलचा वापर अन्न उद्योग, कॉस्मेटिक, फार्मा उद्योग इत्यादींमध्ये केला जातो. एलोवेरा जेल एक शानदार प्रोडक्ट आहे. हे कोरफडीच्या पानांपासून तयार केले जाते. एलोवेरा जेलचा वापर स्किन केयर उत्पादनांमध्ये केला जातो. अशा परिस्थितीत त्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. किती खर्च येईल? खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या (KVIC) रिपोर्टनुसार, त्याची प्रोजेक्ट कॉस्ट 24.83 लाख रुपये आहे. तुम्हाला त्यात फक्त 2.48 लाख रुपये गुंतवावे लागतील. बाकीचे पैसे तुम्ही सरकारकडून कर्ज घेऊन घेऊ शकता. तुम्हाला 19.35 लाख रुपयांचे टर्म लोन मिळेल आणि वर्किंग कॅपिटलसाठी 3 लाख रुपये फायनेंस होतील. हा बिझनेस सुरू करण्यासाठी, जीएसटी रजिस्ट्रेशन, उद्योग आधार रजिस्ट्रेशन, प्रोडक्टचे ब्रँड नाव आणि आवश्यक असल्यास, ते ट्रेडमार्क देखील केले जाऊ शकते. बिझनेससाठी कर्ज घ्यायचे असल्यास तुम्ही सरकारच्या मुद्रा लोनची मदत घेऊ शकता. Business Idea: एकदा करा या रोपाची शेती, 5 वर्ष होईल बंपर कमाई; 20 हजार रु. लिटरनेही विकतं याचं तेल जाणून घ्या किती कमाई होईल या व्यवसायातून तुम्ही वार्षिक 13 लाख रुपये सहज कमवू शकता. पहिल्या वर्षी सुमारे 4 लाख रुपयांचा नफा होऊ शकतो. त्यानंतर हा नफा झपाट्याने वाढतो. एलोवेरा जेलची जागतिक बाजारपेठही दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत हा व्यवसाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.