मुंबई, 7 ऑगस्ट: आपलं बँक खातं असो, बँक लॉकर असो किंवा मग एफडी या सगळ्यांसाठी आपण नॉमिनीचं नाव नोंदवलेलं असतं. आपल्या पश्चात आपल्या खात्यातील रक्कम कोणाला देण्यात यावी यासाठी नॉमिनीचं (Nominee) नाव नोंदवणं गरजेचं असतं. आपल्या इतर खात्यांप्रमाणेच आपल्या पीएफ खात्यालाही नॉमिनीचं (Add Nominee to PF account) नाव जोडणं आवश्यक आहे. ईपीएफ आणि ईपीएस (एम्प्लॉई पेन्शन स्कीम) (EPF and EPS nominee) या दोन्हीबाबत नॉमिनीची माहिती देणे गरजेचं आहे, ज्यामुळे खातेधारकाच्या अकाली मृत्यूनंतर त्याच्या खात्यातील रक्कम नॉमिनीला वेळेत मिळू शकेल.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ईपीएफओ (EPFO) ही आपल्या कर्मचाऱ्यांना इन्शुरन्स कव्हरची सुविधा देते. एम्प्लॉई डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स (Employee Deposit Linked Insurance Scheme) या योजनेअंतर्गत ही सुविधा उपलब्ध केली जाते. या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्याच्या नॉमिनीला जास्तीत जास्त सात लाख रुपयांपर्यंत इन्शुरन्स कव्हर (EPFO 7 Lakh Insurance cover) दिलं जातं. एखाद्या कर्मचाऱ्याने नॉमिनी म्हणून कोणाचंही नाव नोंदवलं नसेल, तर त्याच्या कुटुंबीयांना इन्शुरन्स क्लेमची (EPFO Insurance claim) प्रक्रिया करण्यास अडचण येते. त्यामुळे आपल्या कुटुंबीयांची अडचण कमी करण्यासाठी, आणि त्यांना आवश्यक ती रक्कम वेळेत उपलब्ध व्हावी म्हणून नॉमिनीचं (EPFO nominee) नाव नोंदवणं गरजेचं आहे.
(हे वाचा: SBI Alert! हे काम लवकरात लवकर पूर्ण न केल्यास बँकिंगमध्ये येतील समस्या)
नॉमिनीचं नाव नोंदवण्याची प्रक्रिया तुम्ही ऑनलाईनही करू शकता. यासाठी तुम्हाला ईपीएफओच्या वेबसाईटवर (www.epfindia.gov.in) जावं लागणार आहे. या ठिकाणी गेल्यानंतर सर्व्हिसेज हा पर्याय निवडून, त्यात ‘फॉर एम्प्लॉईज’ वर क्लिक करा. यानंतर मेंबर य़ूएएन किंवा ऑनलाईन सर्व्हिस (ओसीएस/ओटीसीपी) या पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला तुमचा यूएन नंबर आणि पासवर्ड वापरुन लॉग इन करावं लागेल.
लॉग इन केल्यानंतर मॅनेज या टॅबमध्ये जाऊन ‘ई-नॉमिनेशन’ हा पर्याय निवडा. यानंतर प्रोव्हाईड डिटेल्स टॅब दिसेल, यात ‘सेव्ह’ या पर्यायावर क्लिक करा. फॅमिली डिक्लेरेशन अपडेट करण्यासाठी ‘येस’ हा पर्याय निवडा. यानंतर ‘ॲड फॅमिली डिटेल्स’ या पर्यायावर क्लिक करुन तुम्ही नॉमिनींची नोंदणी करू शकता. तुम्ही एकाहून अधिक नॉमिनीज निवडू शकता. तसेच, तुमच्या खात्यातील रकमेचा कोणाला किती भाग मिळेल हेदेखील तुम्ही ठरवू शकता. यासाठी तुम्हाला ‘नॉमिनेशन डिटेल्स’ या पर्यायावर क्लिक करावं लागेल.
(हे वाचा: ATM मधून पैसे न येताच रक्कम वजा झाल्यास बँकेला द्यावी लागते नुकसानभरपाई)
यानंतर सेव्ह ईपीएफ नॉमिनेशन या पर्यायावर क्लिक करा. पुढे ‘ई साईन’ पर्यायावर क्लिक केल्यानंतर ओटीपी जनरेट होईल. हा ओटीपी तुमच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवर येईल. ओटीपी एंटर केल्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण होईल. अशा प्रकारे आपल्या ईपीएफ किंवा ईपीएस खात्यामध्ये नॉमिनीचं नाव जोडू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Business News, Money