मराठी बातम्या /बातम्या /मनी /ATM मधून पैसे निघाले नाही आणि खात्यातून रक्कम वजा झाल्यास बँकेना 12 दिवसांत कार्यवाही करणं आहे बंधनकारक, जाणून घ्या त्यासंबंधीचे नियम

ATM मधून पैसे निघाले नाही आणि खात्यातून रक्कम वजा झाल्यास बँकेना 12 दिवसांत कार्यवाही करणं आहे बंधनकारक, जाणून घ्या त्यासंबंधीचे नियम

एटीएममधून पैसे न येता खात्यातून वजा झाले तर त्याबाबतच्या ग्राहकाने केलेल्या तक्रारीवर 12 दिवसांत कार्यवाही करणं बँकेला बंधनकारक आहे.

एटीएममधून पैसे न येता खात्यातून वजा झाले तर त्याबाबतच्या ग्राहकाने केलेल्या तक्रारीवर 12 दिवसांत कार्यवाही करणं बँकेला बंधनकारक आहे.

एटीएममधून पैसे न येता खात्यातून वजा झाले तर त्याबाबतच्या ग्राहकाने केलेल्या तक्रारीवर 12 दिवसांत कार्यवाही करणं बँकेला बंधनकारक आहे.

मुंबई, 06 ऑगस्ट:  बँकेचे व्यवहार आपल्यापैकी बरेच जण करतात. समाजातील जो घटक बँकांशी जोडलेला नव्हता त्याला बँकेच्या यंत्रणा आणण्यासाठी सरकारने जनधन योजना (JanDhan Scheme) राबवली आणि मोठ्या प्रमाणात लोकांचे पैसे बँकेत आले. आपले पैसे सुरक्षित ठेवणं आणि आर्थिक व्यवहारांसंबधी (Financial Services) सुविधा देणं हे बँकांचं मुख्य काम असतं आणि याबाबत अनेक नियमही असतात. ग्राहकांना उत्तम सेवा देताना त्यांचं हितही बँकांना लक्षात ठेवावं लागतं. कधीकधी ग्राहकांना या नियमांची आणि त्यांच्या अधिकारांची माहिती नसते त्यामुळे त्यांचा तोटा होतो. अशाच काही नियमांबद्दल आम्ही बोलत आहोत. तुम्ही जर बँकेच्या एटीएम मशीनमधून (ATM Machine) पैसे काढण्याची प्रक्रिया केली आणि एटीएममधून पैसे बाहेर आले नाहीत. त्याचवेळेस तुमच्या खात्यातून ती रक्कम वजा झाल्याचा मेसेज तुम्हाला आला तर तुम्ही काय कराल? तुम्ही बँकेकडे तक्रार कराल आणि त्यानंतरही पैसे खात्यात जमा झाले नाहीत तर? तर काय करायचं ते आम्ही या बातमीत सांगणार आहोत. टीव्ही 9 हिंदीनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

अनेकदा असं होतं की एटीएम मशीनमधून आपण नोंदवलेली रक्कम बाहेर येत नाही पण खात्यातून ती वजा होते. आपण विचार करतो की कोणत्याही तक्रारीशिवाय बँक आपोआप वजा झालेले पैसे पुन्हा खात्यात जमा करेल. पण तुम्ही याची तक्रार बँकेकडे करू शकता आणि जर ते पैसे 12 कार्यालयीन दिवसांत जमा झाले नाहीत तर बँकेला तुम्हाला नुकसानभरपाईपोटी दररोज 100 रुपये द्यावे लागतात.

RBI Monetary Policy: रेपो रेट 4% कायम राहणार, जाणून घ्या RBI पॉलिसीतील ठळक मुद्दे

जर एटीएम मशीनमधून पैसे निघाले नाहीत (Cash Withdrawal) तर तुम्ही डेबिट कार्ड देणाऱ्या बँकेत तक्रार करू शकता आणि जरी तुम्ही तुम्हाला कार्ड दिलेल्या बँकेच्या व्यतिरिक्त इतर बँकेच्या एटीएममधून पैसे काढले असले तरीही तुम्हाला अशी तक्रार करता येते.

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (Reserve Bank Of India) नियमांनुसार पैसे न मिळता खात्यातून वजा झाल्याची तक्रार बँकेला मिळाल्यापासून 12 कार्यालयीन दिवसांत त्या तक्रारीचं निवारण करून संबंधित ग्राहकाच्या खात्यावर ती रक्कम जमा करणं बंधनकारक आहे. 12 दिवसांत आपल्या तक्रारीवर कार्यवाही झाली नाही तर काय करायचं जाणून घ्या.

Gold Price Today: आज खरेदी करा स्वस्त सोनं! सातत्याने उतर आहेत गोल्ड रेट्स; आज किती आहे भाव?

1 जुलै 2011 पासून असा नियम लागू करण्यात आला आहे की या प्रकारची तक्रार मिळाल्यापासून ती निवारणासाठी 7 कार्यालयीन दिवसांपेक्षा (Working Days) अधिक काळ लागला तर 7 व्या दिवसापासून दररोज 100 रुपयांची नुकसानभरपाई बँकेने ग्राहकाच्या खात्यात जमा करणं बंधनकारक आहे. आणखी महत्त्वाचं या नुकसानभरपाईसाठी ग्राहकानी अर्ज केलेला नसतानाही ती बँकेला जमा करावीच लागते. बँकेनी सेवा देण्यास केलेल्या विलंबामुळे त्यांना ही रक्कम भरावी लागते. पण या नियमाला पात्र ठरण्यासाठी तुम्ही व्यवहार झाल्यापासून 30 दिवसांच्या (Within 30 Days) आत बँकेकडे तक्रार नोंदवणं गरजेचं आहे. जरी तुम्ही बँकेत तक्रार केली आणि वारंवार आठवण करूनही बँकेने कारवाई केली नाही तर तुम्ही स्थानिक बँकिग लोकपालांकडे बँकेविरुद्ध तक्रार करू शकता.

First published:
top videos

    Tags: ATM, Money