Home /News /money /

नोकरी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, मोदी सरकार सुटीबद्दलचा नियम बदलण्याची शक्यता

नोकरी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, मोदी सरकार सुटीबद्दलचा नियम बदलण्याची शक्यता

केंद्रीय कर्मचाऱ्यांना 15 दिवसांची पॅटर्निटी लीव्ह देण्याची तरतूद आहे. पण बहुतांश खाजगी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना पॅटर्निटी लीव्हचा फायदा मिळत नाही.त्यामुळेच सरकार आता धोरणाच्या पातळीवर काही निर्णय घेणार आहे.

    नवी दिल्ली, 3 जानेवारी : नव्या वर्षात सरकार पुरुष कर्मचाऱ्यांना मोठी भेट देऊ शकतं. CNBC आवाज़ मिळालेल्या सूत्रांनुसार कामगार कल्याण मंत्रालयाने पुरुष कर्मचाऱ्यांना पॅटर्निटी लीव्ह देण्याची तयारी सुरू केली आहे.पॅटर्निटी लीव्हबद्दल सरकारने कोणतंही राष्ट्रीय धोरण बनवलेलं नाही. केंद्रीय कर्मचाऱ्यांना 15 दिवसांची पॅटर्निटी लीव्ह देण्याची तरतूद आहे. याच आधारे खाजगी कंपन्याही कर्मचाऱ्यांना 15 दिवसांची पॅटर्निटी लीव्ह देतात. काही कंपन्या तर आणखी कमी रजा देतात. खाजगी क्षेत्राबद्दल बोलायचं झालं तर बहुतांश कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना पॅटर्निटी लीव्हचा फायदाही मिळत नाही.त्यामुळेच सरकार आता धोरणाच्या पातळीवर हा निर्णय घेणार आहे. सरकार करणार कायदा? सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत याबद्दल काही निर्णय घेतला जाईल. कामगार कल्याण मंत्रालय याबद्दल कायदा करण्याच्या विचारात आहे. हा निर्णय धोरणाच्या स्तरावर घेतला तर कर्मचाऱ्यांना याचा जास्त फायदा मिळेल. हेही वाचा : खूशखबर! सलग दुसऱ्या महिन्यात GST ची वसुली गेली 1 कोटींवर पॅटर्निटी लीव्हचा कालावधी वाढवता येईल का यावरही विचार सुरू आहे. अनेक कंपन्यांमध्ये पुरुष कर्मचाऱ्यांची संख्या 70 टक्क्यांपेक्षाही जास्त आहे. या स्थितीत ही रजा जास्तीत एक महिने होऊ शकते, अशी चिन्हं आहेत. हवं संतुलित प्रमाण कंपन्यांमध्ये पुरुष आणि स्त्री कर्मचाऱ्यांचं प्रमाण संतुलित असावं यासाठीही सरकार प्रयत्न करतंय. खाजगी क्षेत्रात जास्तीत जास्त महिला कर्मचाऱ्यांची भरती व्हावी, असं सरकारचं म्हणणं आहे. खाजगी क्षेत्रातल्या कंपन्यांचं याबद्दल काय मत आहे ते विचारात घेऊन याबद्दलचं धोरण ठरवलं जाणार आहे. (हेही वाचा : नव्या वर्षात खाजगी क्षेत्रात मिळणार 7 लाख नोकऱ्या, 8 टक्क्यांनी वाढणार पगार)
    Published by:Arti Kulkarni
    First published:

    Tags: Leave, Money

    पुढील बातम्या