जाहिरात
मराठी बातम्या / मनी / खूशखबर! सलग दुसऱ्या महिन्यात GST ची वसुली गेली 1 कोटींवर

खूशखबर! सलग दुसऱ्या महिन्यात GST ची वसुली गेली 1 कोटींवर

खूशखबर! सलग दुसऱ्या महिन्यात GST ची वसुली गेली 1 कोटींवर

नवी दिल्ली, 1 जानेवारी : GST वसुलीच्या स्तरावर केंद्र सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार सलग दुसऱ्या महिन्यात ही वसुली 1 लाख कोटींवर गेलीय. एप्रिलपासून डिसेंबरपर्यंतच्या आकडेवारीनुसार सप्टेंबर ते ऑक्टोबर या 3 महिन्यांच्या काळात GST ची वसुली 1 कोटींपेक्षा कमी होती. या आर्थिक वर्षात एप्रिल महिन्यात GST ची वसुली सगळ्यात जास्त 1 लाख 13 हजार 865 कोटी रुपये होतं. जुलै 2019 मध्ये GST लागू केल्यानंतर हा असा नववा महिना ज्या महिन्यात वसुली 1 लाख कोटींवर गेलीय.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 1 जानेवारी : GST वसुलीच्या स्तरावर केंद्र सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार सलग दुसऱ्या महिन्यात ही वसुली 1 लाख कोटींवर गेलीय. एप्रिलपासून डिसेंबरपर्यंतच्या आकडेवारीनुसार सप्टेंबर ते ऑक्टोबर या 3 महिन्यांच्या काळात GST ची वसुली 1 कोटींपेक्षा कमी होती. या आर्थिक वर्षात एप्रिल महिन्यात GST ची वसुली सगळ्यात जास्त 1 लाख 13 हजार 865 कोटी रुपये होतं. जुलै 2019 मध्ये GST लागू केल्यानंतर हा असा नववा महिना ज्या महिन्यात वसुली 1 लाख कोटींवर गेलीय. GST वसुलीसोबतच 2019 - 2020 या आर्थिक वर्षासाठी कराचं लक्ष्य गाठण्याच्या सूचना अधिकाऱ्य़ांना दिल्या आहेत. सरकारने 2019 - 2020 मध्ये 13. 35 कोटी रुपयांचा प्रत्यक्ष कर वसूल करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे.

जाहिरात

महसूल विभाग पुढच्या 4 महिन्यांत करवसुली वाढवण्यासाठी ठोस पावलं उचलतंय. CBIC आणि CBDT च्या सदस्यांसोबत चर्चा करून लक्ष्य गाठण्याचं उद्दिष्ठ ठेवलं आहे. कराची वसुली वाढवण्याच्या प्रयत्नांबरोबरच अधिकाऱ्यांना याही सूचना देण्यात आल्या आहेत की करदात्यांना अनावश्यक त्रास होऊ नये. त्यामुळे करदात्यांची जबाबदारी आणि कार्यक्षम यंत्रणांमुळे GST ची वसुली वाढवण्याचा सरकारचा मानस आहे. (हेही वाचा : खूशखबर! नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशीच सोनं झालं स्वस्त, हे आहेत आजचे दर) ============================================================================

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: GST , money
  • First Published :
जाहिरात
जाहिरात