Home /News /career /

खूशखबर! नव्या वर्षात खाजगी क्षेत्रात मिळणार 7 लाख नोकऱ्या, 8 टक्क्यांनी वाढणार पगार

खूशखबर! नव्या वर्षात खाजगी क्षेत्रात मिळणार 7 लाख नोकऱ्या, 8 टक्क्यांनी वाढणार पगार

नव्या वर्षात (2020) खाजगी क्षेत्रात 7 लाख नोकऱ्या तर खाजगी क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात 8 टक्क्यांची वाढ होणार असा एका सर्व्हेचा निष्कर्ष आहे

    नवी दिल्ली, 2 जानेवारी : नव्या वर्षात (2020) खाजगी क्षेत्रात 7 लाख नोकऱ्या निर्माण होतील, असा अंदाज आहे. त्याचबरोबर खाजगी क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात 8 टक्क्यांची वाढ होणार आहे,असा एका सर्व्हेचा निष्कर्ष आहे. माय हायरिंग क्लब डॉट कॉम myhiringclub.com आणि सरकारी नोकरी डॉट कॉम sarkarinoukri.info यांच्या रोजगाराबद्दलच्या सर्वेक्षणात(MSETS) हा संकेत देण्यात आला आहे.रोजगाराबद्दलचा आढावा घेणाऱ्या कंपनीचे सीईओ राजेश कुमार यांच्या मते 2020 सुमारे 7 लाख नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे. स्टार्ट अप कंपन्या रोजगार निर्मितीमध्ये सगळ्यात जास्त योगदान देतील, असा अंदाज आहे. रोजगारामध्ये ही शहरं पुढे या सर्वेक्षणात 42 शहरांमधल्या रोजगारनिर्मितीचा आढावा घेण्यात आला. 12 औद्योगिक क्षेत्रातल्या 4 हजार 278 कंपन्यांचा यामध्ये सहभाग होता. बंगळुरू, मुंबई, दिल्ली NCR, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद, अहमदाबाद आणि पुणे ही शहरं रोजगार निर्मितीमध्ये अग्रेसर आहेत. या शहरांमध्ये एकूण 5 लाख 14 हजार 900 नोकऱ्या निर्माण होतील, असं अनुमान काढण्यात आलंय. रिटेल आणि ई कॉमर्समध्ये सगळ्यात जास्त नोकऱ्या 2020 मध्ये सगळ्यात जास्त रोजगार ई कॉमर्स क्षेत्रात निर्माण होतील, अशी अपेक्षा आहे. आयटी, आरोग्य क्षेत्र, औद्योगिक उत्पादन, बँकिंग, वित्तीय सेवा, विमा या क्षेत्रांतही जास्त नोकऱ्या उपलब्ध होतील. देशातली आर्थिक मंदी आणि बेरोजगारीची समस्या वाढत चाललीय. या पार्श्वभूमीवर नव्या वर्षात यावर काही तोडगा निघेल, अशी अपेक्षा आहे. गेल्या वर्षी GDP ची नोंद 4.5 टक्के एवढी झाली होती. हा खालावलेला GDP दर सुधारण्यासाठी सरकारला प्रयत्न करावे लागणार आहेत. रोजगार आणि उत्पादनाचं प्रमाण वाढवणं हे मोदी सरकारपुढचं मुख्य उद्दिष्ट आहे.
    Published by:Arti Kulkarni
    First published:

    Tags: Job, Jobs apply, Jobs vacancy

    पुढील बातम्या