नवी दिल्ली, 10 जानेवारी : रिझर्व्ह बँकेने KYC च्या नियमांबद्दल एक मोठी घोषणा केलीय. यानुसार आता ग्राहक व्हिडिओच्या माध्यामतून KYC म्हणजे Know your customer ची प्रक्रिया पूर्ण करू शकतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)ने मास्टर KYC गाइडलाइन्सची पडताळणी केली. KYC प्रक्रिया मोबाइल व्हिडिओवर संभाषण करूनही होऊ शकते. गैरबँकिंग वित्तीय कंपन्या, वॉलेट सर्व्हिस प्रोव्हायडर्स यासारख्या कंपन्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. दुर्गम भागात राहणाऱ्या ग्राहकांनाही यामुळे बँकेचे व्यवहार करणं सोपं होईल आणि खर्चही कमी होईल. याशिवाय रिझर्व्ह बँकेने आधार आणि आणखी काही दस्तावेजाच्या आधारावर डिजिटल KYC ची सुविधा दिली आहे. यासाठी सुरू झाली सेवा रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे भारतीय मार्केटचा आता जगभरातल्या निवडक मार्केट्समध्ये समावेश झाला आहे. KYC नियमांबद्दल RBI ने काढलेल्या नोटिफिकेशननुसार ग्राहकांना परवानगीवर आधारित पर्यायी व्यवस्था दिली जाईल. यामुळे ग्राहकांची ओळख पटवणं सोपं होईल. असं होईल KYC अगदी दुर्गम भागातही वित्तीय संस्थांचे अधिकारी पॅन, आधार कार्ड किंवा काही प्रश्नांच्या माध्यमातून ग्राहकांची ओळख पटवतील. तो ग्राहक देशातच आहे की नाही याची खात्री करावी लागेल. हे केल्याने ग्राहकांचं जिओ लोकेशन कॅप्चर होईल. (हेही वाचा : LIC ची जीवन प्रगती योजना, रोज खर्च करा 200 रुपये आणि मिळतील 28 लाख) व्हिडिओ कॉल नेमका कसा असेल? ग्राहकाला केलेला व्हिडिओ कॉल संबंधित बँकेच्या डोमेनमधूनच केला पाहिजे. गूगल ड्युओ किंवा व्हॉट्सअॅपसारख्या थर्ड पार्टी सोर्समधून हा कॉल केलेला नसावा. बँकांना व्हिडिओ KYC प्रक्रिया सुरू करण्याआधी तुमचा अर्ज आणि वेबसाइटला लिंक करावं लागेल. नोटिफिकेशननुसार VCIP प्रक्रियेसाठी प्रशिक्षित अधिकाऱ्याचीच गरज लागेल. ==========================================================================================
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.