12 वी उत्तीर्ण असलेल्यांना भारतीय नौदलात संधी, 'या' पदांसाठी करा अर्ज

12 वी उत्तीर्ण असलेल्यांना भारतीय नौदलात संधी, 'या' पदांसाठी करा अर्ज

इच्छुक आणि योग्य उमेदवार या पदांवर अर्ज करण्यासाठी नौदलाच्या वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज 10 जुलैपर्यंत स्वीकारले जातील.

  • Share this:

मुंबई, 14 जून : Indian Navy Recruitment 2019: भारतीय नौदलात अनेक पदांवर भरती सुरू केलीय. भरतीची नोटिफिकेशन आॅफिशियल वेबसाइट joinindian navy.gov.in वर प्रसिद्ध केलंय. यानुसार एकूण 2700 पदांवर नियुक्ती केली जाईल. यात 2200 पदं इंडियन नेव्ही SSR ( सीनियर सेकंडरी रिक्रूटमेंट )साठी आणि 500 इंडियन नेव्ही (Artificer Apprentice) साठी आहेत. इच्छुक आणि योग्य उमेदवार या पदांवर अर्ज करण्यासाठी नौदलाच्या वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज 10 जुलैपर्यंत स्वीकारले जातील. तुम्ही आॅफिशियल वेबसाइटवर जाऊन नीट माहिती वाचून अर्ज करू शकता.

या पदांवर अर्ज करण्यासाठी उमेदवाराची शैक्षणिक योग्यता बारावी हवी. बारावीत गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र किंवा कम्प्युटर सायन्स यांपैकी विषय असणं आवश्यक आहे. बारावीत कमीत कमी 60 टक्के किंवा त्याहून जास्त गुण हवेत.

JEE Advanced result 2019 : मुंबईचा कार्तिकेय गुप्ता देशात पहिला

1.14 लाख गुंतवून सुरू करा व्यवसाय आणि कमवा महिन्याला 15 हजार रुपये

या पदांसाठी उमेदवारांची निवड कम्प्युटर आधारित परीक्षेवर केली जाईल. त्यानंतर शारीरिक दक्षता परीक्षा ( पीएफटी ) आणि मेडिकल परीक्षांच्या फिटनेसवर होईल.

घर खरेदी करणाऱ्यांना मोदी सरकार देऊ शकतं मोठा दिलासा

याशिवाय काही दिवसांपूर्वी अविवाहित तरुणांकडून वेगवेगळ्या पदासाठी अर्ज मागवण्यात आले होते. नौसेनच्या जून 2020 च्या INET या प्रवेश परीक्षेसाठी हे अर्ज मागवण्यात आले होते. या परीक्षेत उत्तीर्णा होणाऱ्या उमेदवारांची नेव्हल ओरिएंटेशन कोर्स (NOC) च्या रेग्युलर पायलट, पर्यवेक्षक, एअर ट्रॅफिक कंट्रोलर, नेव्हल आर्ममेंट इन्स्पेक्शन कॅडर, लॉजिस्टिक, शिक्षा, इन्फोर्मेंच टेक्नॉलॉजी तसंच टेक्‍न‍ीकल इंजिनियर आणि इलेक्‍ट्र‍िकल इंजिनियर या पदांवर काम करण्याचा संधी मिळणार आहे.

VIDEO : नाशिक सशस्त्र दरोड्यावर विश्वास नांगरे-पाटलांची प्रतिक्रिया

First published: June 14, 2019, 4:07 PM IST

ताज्या बातम्या