मोदी सरकारची मुलींच्या शिक्षणासाठी आहे 'ही' मोठी योजना

मोदी सरकारची मुलींच्या शिक्षणासाठी आहे 'ही' मोठी योजना

Pragati Scheme, Modi Government - मुलींचं शिक्षण आर्थिक अडचणींमुळे थांबू नये यासाठी ही योजना महत्त्वाची आहे

  • Share this:

मुंबई, 25 जून : तुम्हाला मोदी सरकारच्या प्रगती स्कीमबद्दल माहीत आहे का? आर्थिक अडचणींमुळे आता तुमच्या मुलीचं शिक्षण संपायला नको. या योजनेत हुशार मुलींना 50 हजार रुपयांची स्काॅलरशिप मिळते. ही स्काॅलरशिर टेक्निकल शिक्षणासाठी मिळते. या योजनेअंतर्गत AICTE च्या मान्यताप्राप्त संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दर वर्षाला 50 हजार रुपयांची स्काॅलरशिप दिली जाते. यात 30 हजार रुपये ट्युशन फी म्हणून देतात आणि 20 हजार रुपये दुसऱ्या खर्चांसाठी दिले जातात.

काय आहे ही योजना?

नव्या योजनेत टेक्निकल शिक्षणात पदवी आणि पदविका घेणाऱ्या विद्यार्थिंनींना दर वर्षी स्काॅलरशिप दिली जाते. पण त्यासाठी काही नियम असतात.

आरोग्यसेवेत 'हे' राज्य नंबर 1, महाराष्ट्राचं स्थान कितवं?

दर वर्षी 4 हजार मुलींच्या शिक्षणासाठी पैसे मिळतील. त्यात 2 हजार रुपये डिप्लोमा कोर्ससाठी आणि बाकी 2 हजार डिगरी कोर्स करणाऱ्या विद्यार्थिनींना मिळतात.

AICTE ची मान्यता असलेल्या टेक्निकल इन्स्टिट्युटमधून डिप्लोमा आणि डिगरी मिळवणाऱ्या मुलींना स्काॅलरशिप मिळते.

TRAI बदलणार अनेक नियम, आता टीव्ही पाहणं होईल स्वस्त

समजा योग्य उमेदवार मिळाले नाहीत तर ही स्काॅलरशिप दुसऱ्या प्रोग्रॅमच्या पदवी किंवा पदविका कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिली जाते.

एका कुटुंबातल्या 2 मुलींना स्काॅलरशिप मिळू शकते. पण त्या कुटुंबाची वार्षिक कमाई 8 लाखापेक्षा कमी हवी.

मोदी सरकारचा निर्णय, वाहतूक नियम मोडले तर पडेल मोठा दंड

कुणाला स्काॅलरशिप द्यायची हे मेरिट लिस्टवरून ठरतं. AICTEची मान्यता असलेल्या टेक्निकल इन्स्टिट्युटची मेरिट लिस्ट घेतली जाते.

स्काॅलरशिपमध्ये 30 हजारांची रक्कम ट्युशन फी म्हणून दिली जाते. 10 महिन्यांपर्यंत 2-2 हजार रुपये दिले जातात.

यात आरक्षणही लागू आहे. अनुसूचित जातींसाठी 15 टक्के, अनुसूचित जनजातींसाठी 7.5 टक्के आणि ओबीसी उमेदवारांसाठी 27 टक्के आरक्षण आहे.

VIDEO : चंद्रकांत पाटलांचं आता अजित पवार टार्गेट, केला नवा निर्धार!

Tags:
First Published: Jun 25, 2019 07:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading