नवी दिल्ली, 01 सप्टेंबर: इन्कम टॅक्स संबंधित, आधार कार्ड-पॅन कार्ड संबंधित महत्त्वाच्या कामं याच महिन्यात पूर्ण करा. या महिन्यात या आर्थिक कामांसाठी डेडलाइन देण्यात आली आहे. ही आर्थिक आर्थिक कामं तुम्हाला साधारण 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करावी लागतील. नाहीतर तुमची बँकेच्या ट्रान्झॅक्शन सारखी कामं अडकू शकतात. जाणून घ्या कोणती आर्थिक कामं तुम्हाला 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करायची आहेत.
1. इन्कम टॅक्स फायलिंग डेडलाइन (Income Tax Filling Deadline for AY 2020-21/CBDT)
सरकारने इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्याची तारीख 30 सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. जर तुम्ही या डेडलाइनपर्यंत रिटर्न फाइल केला नाही तर नंतर हे काम पूर्ण करण्यात अडचणी येतील. जर एका फायनान्शिअल वर्षात एकूण उत्पन्न पाच लाखांपेक्षा जास्त नाही तर तुम्हाला 1000 रुपये दंड भरावा लागू शकेल.
हे वाचा-Petrol Price Today: पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण, सामान्यांना मोठा दिलासा2. पॅन-आधार लिंकिंग (PAN Aadhaar Linking)
सरकारकडून पॅन कार्ड आधार कार्डाशी लिंक करणं (PAN-Aadhaar linking) अनिवार्य करण्यात आलं आहे. सध्या पॅन-आधार लिंक करण्याची तारीख 30 सप्टेंबर आहे. ग्राहकांनी पॅन-आधार लिंक केले नाही तर त्यांच्या बँकिंग सेवा बाधित होऊ शकतात. तुम्ही पॅन-आधार लिंक केले नाही तर तुमचे पॅन निष्क्रिय होईल आणि त्यामुळे अनेक आर्थिक कामांमध्ये अडथळा येऊ शकतो. इन्कम टॅक्स रिटर्न भरताना देखील समस्या उद्भवू शकते.
3. डिमॅट खात्यात केवायसी अपडेट (Update your KYC in demat account)
डिमॅट अकाउंट किंवा ट्रेडिंग अकाउंट असणाऱ्यांना कॅपिटल मार्केट रेग्युलेटर सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (SEBI) 30 सप्टेंबरपर्यंत केवायसी डिटेल्स पूर्ण करण्याचा सल्ला दिला आहे. जर तुमचे 30 सप्टेंबरपर्यंत केवायसी डिटेल्स अपडेटेड नसतील तर तुमचं डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट डिअॅक्टिव्हेट होऊ शकतं. तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करता येणार नाही. शेअर ट्रान्सफर देखील करता येणार नाही. त्यामुळे निश्चित वेळेआधी डिमॅट खाते अपडेट करा.
हे वाचा-LPG Gas Cylinder: सर्वसामान्यांना मोठा फटका, पुन्हा महागला गॅस सिलेंडर4. आधार-पीएफ लिंक (Aadhaar PF Link)
तुमचं आधार कार्ड ईपीएफ खात्याशी लिंक करणं अत्यंत आवश्यक आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या (Employees Provident Fund EPF) सदस्यांना त्यांच्या UAN क्रमांकाशी आधार कार्ड (Aadhar Card) लिंक करणं अनिवार्य आहे. दरम्यान आधार कार्ड आणि पीएफ खातं लिंक करण्याची तारीख (Deadline to link Aadhar Card with epf Account) 1 सप्टेंबर आहे. तुमचा आधार क्रमांक यूएएनशी लिंक नसेल तर सब्सक्रायबर्सच्या खात्यात एम्प्लॉयरचे योगदान थांबवले जाऊ शकते.
Published by:Janhavi Bhatkar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.