नवी दिल्ली, 17 जुलै: भारताच्या अर्थव्यवस्थेत (Indian Economy) शेतीला अत्यंत महत्त्व आहे. देशाचा आर्थिक विकास शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. दरम्यान शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारने (Modi Government) विविध योजना आणल्या आहेत. आता शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी मोदी सरकारने डिजिटल प्लॅटफॉर्म किसान सारथी (Kisan Sarathi) हा प्लॅटफॉर्म लाँच केला आहे. या डिजिटल प्लॅटफॉर्मवर (Digital Platform) शेतकऱ्यांना पीक आणि त्यासंदर्भातील विविध माहिती देण्यात येईल. या प्लॅटफॉर्मवर शेतकऱ्यांना त्यांच्या भाषेमध्ये माहिती मिळवता येईल. शिवाय या प्लॅटफॉर्मच्या मदतीने शेतकऱ्यांनी त्यांचं पीक आणि भाज्या यांची विक्रीही करता येईल.
कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एकत्रितपणे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे किसान सारथी लाँच केलं आहे. यावेळी वैष्णव यांनी असं म्हटलं की, डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे शेतकरी थेट वैज्ञानिकांकडून शेती आणि त्यासंबंधित क्षेत्राबाबत वैयक्तिक सल्लामसलत करू शकतात. त्यांनी पुढे असं म्हटलं की, शेतकऱ्यांच्या पीकांना त्यांच्या शेतापासून थेट गोदामं, बाजार आणि ज्या ठिकाणी त्यांना कमी तोट्याने विकायचे आहे अशा ठिकाणी पोचविण्याच्या क्षेत्रात नवीन तांत्रिक हस्तक्षेपावर संशोधन केले पाहिजे.
हे वाचा-HDFC Alert! उद्या 6 तास बंद असणार या बँक सेवा; आजच पूर्ण करा महत्त्वाची कामं
Kisan Sarathi चा काय आहे फायदा?
किसान सारथीच्या साहाय्याने शेतकऱ्यांना चांगले पीक, योग्य प्रमाणात उत्पादन आणि इतर अनेक मूलभूत गोष्टींची माहिती मिळू शकेल. शेतकरी पिकाशी संबंधित कोणतीही माहिती थेट वैज्ञानिकांकडून डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे घेऊ शकतात. तसेच, आपण शेतीच्या नवीन पद्धती शिकू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Farmer, Modi government, PM narendra modi