जाहिरात
मराठी बातम्या / मनी / HDFC ग्राहकांसाठी Alert! उद्या 6 तास बंद असणार या बँक सेवा; खोळंबा टाळण्यासाठी आजच पूर्ण करा तुमची कामं

HDFC ग्राहकांसाठी Alert! उद्या 6 तास बंद असणार या बँक सेवा; खोळंबा टाळण्यासाठी आजच पूर्ण करा तुमची कामं

HDFC ग्राहकांसाठी Alert! उद्या 6 तास बंद असणार या बँक सेवा; खोळंबा टाळण्यासाठी आजच पूर्ण करा तुमची कामं

तुमचे बँक खाते जर एचडीएफसी बँकेत (HDFC Bank) आहे तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. 18 जुलै रोजी काळी काळाकरता मेंटेनन्ससाठी बँकेच्या मोबाइल बँकिंग आणि इंटरनेट बँकिंग या सेवा बंद असणार आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 16 जुलै: देशातील सर्वात मोठी खासगी बँक असणाऱ्या एचडीएफसी बँकेने (HDFC Bank) त्यांच्या ग्राहकांना मेसेज, इमेलच्या माध्यमातून एक महत्त्वाची माहिती दिली आहे. बँकेने ग्राहकांना पाठवलेल्या या मेसेजमध्ये असं म्हटलं आहे की मेंटेनन्सकरता 18 जुलै रात्री 12 वाजल्यापासून ते 18 जुलै सकाळी 6 वाजेपर्यंत नेट बँकिंग (Net Banking) आणि मोबाइल बँकिंग (Mobile Banking) या सेवा बंद राहणार आहेत. या दरम्यान ग्राहकांना या सेवांचा लाभ घेता येणार नाही. बँकेने ग्राहकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. बँकेने काय दिली आहे सूचना? बँकेने ग्राहकांना पाठवलेल्या एका मेलमध्ये म्हटलं आहे की, ‘काही पूर्वनिश्चित मेंटेनन्सच्या कामासाठी 18 जुलै रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत नेट बँकिंग आणि मोबाइल बँकिंग सेवा उपलब्ध असणार नाहीत. तुम्हाला होणाऱ्या गैरसोयीसाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत.’ हे वाचा- Master Card Ban मुळे बँकांमध्ये तणाव! SBI, Axisसह 5 बँका होणार प्रभावित HDFC बँक ही देशातील महत्त्वाच्या बँकांपैकी एक आहे. ग्राहकांना खास सेवा देण्यासाठी बँकेकडून काही वेळा मेंटेनन्स आणि अपग्रेडेशन करण्यात येते. जेणेकरुन ग्राहकांचा बँकिंग अनुभव (Banking Experience) सुधारावा.

News18

कोरोना लॉकडाउन काळात ग्राहकांच्या समस्या दूर करण्यासााठी बँकेने अलीकडेच 19 शहरात 50 ठिकाणी मोबाइल ऑटोमेटेड टेलरिंग मशीन (ATM) उपलब्ध करण्याची घोषणा केली आहे. या एटीएममधून ग्राहक 15 प्रकारचे ट्रान्झॅक्शन करू शकतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bank , hdfc bank
  • First Published :
जाहिरात
जाहिरात