मुंबई, 22 जून : भारत सरकारनं तरुणांना पुढे जाण्यासाठी खास योजना तयार केलीय. तरुणांमधली हुशारी पारखून त्यांना व्यवसायाचं प्रशिक्षण देणं, हा उद्देश आहे. त्यामुळे त्यांना रोजगार मिळवण्यासाठी मदत मिळू शकते. या ट्रेनिंगची फी सरकार स्वत: भरतं. भारतात तरुणांची संख्या जास्त आहे. देशाची प्रगती तरुणांवर अवलंबून असते. त्यासाठीच आहे पंतप्रधान कौशल्य विकास योजना. याबद्दल खूप कमी लोकांना माहीत आहे. त्याबद्दलच जाणून घेऊ या. या योजनेचा मुख्य उद्देश्य ज्या लोकांचं शिक्षण कमी झालंय त्यांना रोजगार मिळावा म्हणून सरकार हे ट्रेनिंग देतंय. या योजनेत सरकारकडून तरुणांना 8 हजार रुपये दिले जातात. कोर्स पूर्ण झाला की सरकार एक सर्टिफिकेट देतं. ते अख्ख्या देशात वापरता येतं. MPSC साठी भरती सुरू, ‘हे’ आहे परीक्षांचं वेळापत्रक RRB recruitment 2019 : 10वी उत्तीर्ण झालेल्यांना संधी, 992 पदांवर भरती या योजनेअंतर्गत तीन महिने, सहा महिने आणि वर्षाच्या अंतरावर रजिस्ट्रेशन करावं लागतं. यात दिलं जाणारं प्रशिक्षण सेक्टर स्किल काउन्सिल आयोजित करते. त्यानंतर उमेदवार उत्तीर्ण झाले की सरकारी प्रमाणपत्र आणि स्किल कार्ड दिलं जातं. त्यामुळे त्यांना नोकरी मिळणं सोपं जातं. या योजनेसाठी कसा करायचा अर्ज? पंतप्रधान कौशल्य विकास योजनेसाठी अर्जदाराला आपलं नाव नोंदवावं लागतं. आपलं नाव, पत्ता आणि ईमेल यांची माहिती भरावी लागते. त्यानंतर अर्जदाराला ज्या एरियात ट्रेनिंग घ्यायचं असेल त्याची निवड करावी लागेल. भ्रष्ट आणि कामचुकार अधिकाऱ्यांची होणार हकालपट्टी, मोदी सरकारचा निर्णय पंतप्रधान कौशल्य विकास योजनेअंतर्गत विविध कोर्स या योजनेत कंस्ट्रक्शन, इलेक्ट्राॅनिक्स आणि हार्डवेअर, फूड प्रोसोसिंग, फर्निचर, फिटिंग, हँडिक्राफ्ट, जेम्स, ज्वेलरी आणि लेदर टेक्नाॅलाॅजी असे एकूण 40 कोर्सेस आहेत. यात तरुणांना प्रशिक्षित करून व्यवसाय सुरू करण्यालायक बनवलं जातं. या कोर्ससाठी लागणारी कागदपत्रं यात प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला आधारकार्ड, दोन पासपोर्ट साइज फोटोज् आणि कुटुंबातल्या एका सदस्याचं आधारकार्ड लागतं. SPECIAL REPORT: शाळेत मराठीची सक्ती, वाहनांवरील पाट्यांसाठी मात्र दंड
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







