MPSC साठी भरती सुरू, 'हे' आहे परीक्षांचं वेळापत्रक

MPSC साठी भरती सुरू, 'हे' आहे परीक्षांचं वेळापत्रक

MPSC Recruitment 2019 : महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमिशन (MPSC ) मध्ये वेगवेगळ्या पदांवर भरती सुरू आहे

  • Share this:

मुंबई, 21 जून : महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमिशन (MPSC ) म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगात वेगवेगळ्या पदांवर भरती सुरू आहे. सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक अशा पदांवर एकूण 555 जागांवर नियुक्ती केली जाईल.

पदं आणि संख्या

सहाय्यक कक्ष अधिकारी - 24

राज्य कर निरीक्षक - 35

पोलीस उपनिरीक्षक - 496

शैक्षणिक पात्रता

उमेदवार पदवीधर हवा. तो पूर्व परीक्षा उत्तीर्ण हवा.

प्रवासाचा वेळ कामाच्या तासात मोजला जावा, कर्मचाऱ्यांची मागणी

वयाची अट

सहाय्यक कक्ष अधिकारी या पदासाठी 1 मे 2019 रोजी 18 ते 38 वर्ष पूर्ण हवं. राज्य कर निरीक्षक या पदासाठी 1 मे 2019 रोजी 18 ते 38 वर्षांच्या मधे असायला हवं. पोलीस उपनिरीक्षकाच्या पदासाठी वयाची अट 19 वर्ष ते 31 वर्ष हवं. मागासवर्गीयांसाठी वयात 5 वर्षांची सूट आहे.

घरी बसून एका काॅलवर ट्रेन तिकीट होईल रद्द, जाणून घ्या प्रोसेस

अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 5 जुलै 2019. अधिक महितीसाठी https://mahampsc.mahaonline.gov.in/MPSC/MPSCHome.aspx इथे क्लिक करा.

पदासाठी परीक्षा

मुख्य परीक्षा संयुक्त पेपर 28 जुलै रोजी औरंगाबाद, पुणे, मुंबई, नागपूर इथे होईल. पोलीस उपनिरीक्षक पदासाठी परीक्षा 4 आॅगस्टला होईल. ही परीक्षाही औरंगाबाद, पुणे, मुंबई, नागपूर होईल. राज्य कर निरीक्षक पदासाठी परीक्षा 11 आॅगस्टला होईल.ही परीक्षा मुंबई इथे होईल. सहाय्यक कक्ष अधिकारी पदासाठी 25 आॅगस्टला परीक्षा होईल. ही परीक्षा मुंबई इथे होईल.

साउथ इंडिया बँकेत सुरू आहे बंपर भरती, 'या' पदांसाठी असा करा अर्ज

अर्जाची फी खुल्या वर्गासाठी 524 रुपये आहे आणि मागासवर्गीयांसाठी 324 रुपये फी आहे.

https://mahampsc.mahaonline.gov.in/MPSC/MPSCHome.aspx या लिंकवर अधिक माहिती मिळेल. सरकारी नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे.

वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात नेतानाच अभिजीत बिचुकलेचा EXCLUSIVE VIDEO

First published: June 21, 2019, 8:44 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading