मुंबई, 21 जून : RRB recruitment 2019: सरकारी नोकरी शोधत असाल तर खुशखबर आहे. 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रेल्वे भरती बोर्ड चांगली संधी घेऊन आलीय. इंटग्रेल कोच आॅफ इंडियन रेल्वे फॅक्टरी अपरेंटिससाठी 992 पदांवर भरती करणार आहे. 10वी उत्तीर्ण आणि IIT केलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 24 जून 2019.
पदाचं नाव - असिस्टंट
पदाची संख्या - 992
शैक्षणिक योग्यता - उमेदवार कमीत कमी 10वी उत्तीर्ण हवा. शिवाय त्याच्याकडे IIT सर्टिफिकेट हवं
वयाची मर्यादा - उमेदवाराचं कमीत कमी वय 15 वर्ष आणि जास्तीत जास्त 24 वर्ष हवं.
प्रवासाचा वेळ कामाच्या तासात मोजला जावा, कर्मचाऱ्यांची मागणी
घरी बसून एका काॅलवर ट्रेन तिकीट होईल रद्द, जाणून घ्या प्रोसेस
मिळणारा पगार
पहिलं वर्ष - 5,700 रुपये
दुसरं वर्ष - 6,500 रुपये
ITI उमेदवार
पहिलं वर्ष - 5700 रुपये
दुसरं वर्ष - 6500 रुपये
तिसरं वर्ष - 7350 रुपये
साउथ इंडिया बँकेत सुरू आहे बंपर भरती, 'या' पदांसाठी असा करा अर्ज
अर्जाची फी
सामान्य, EWS, OBC श्रेणीसाठी अर्जाची फी 100 रुपये आहे. SC, ST, PWD साठी अर्ज फी द्यावी लागणार नाही.
निवड प्रक्रिया
उमेदवाराची निवड 10वी परीक्षेत मिळालेले मार्कस् आणि इंटरव्ह्यू या आधारे होईल. इच्छुक आणि योग्य उमेदवारांनी icf.indianrailways.gov.in इथे अर्ज करावा.
याशिवाय सेंट्रल रेल्वेनं सीनियर सेक्शन ऑफिसर आणि इतर पदांसाठी अर्ज मागवलेत. इच्छुक आणि योग्य उमेदवारानं 28 जून 2019पर्यंत अर्ज करावेत, असं सांगण्यात आलंय.
पोस्ट - सीनियर सेक्शन ऑफिसर आणि इतर 10 पदं
या पदासाठी फक्त अकाउंट डिपार्टमेंटचे निवृत्त रेल्वे कर्मचारी अर्ज करू शकतात. याशिवाय री अॅरेंजमेंटमध्ये ज्याचं वय 65 वर्षापर्यंत आहे, ते या पदासाठी अर्ज करू शकतात.
VIDEO : काँग्रेस आमदार पोलिसांवर भडकले, सभागृहात केला बापाचा उल्लेख