मुंबई, 18 सप्टेंबर : रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारचं दिवाळी गिफ्ट मिळालंय. मंत्रिमंडळाच्या बैठकीचा निर्णय केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितला. ते म्हणाले या वर्षी रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार आहे. या बोनसवर सरकार 2024 कोटी रुपये खर्च करणार आहे. 11 लाख 52 हजार कर्मचाऱ्यांना आता 78 दिवसांचा बोनस मिळणार आहे. दर वर्षी दसऱ्याच्या आधी रेल्वे कर्मचाऱ्यांना उत्पादकतेच्या आधारावर बोनस मिळतो. कुणाला मिळणार बोनसचा फायदा? रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना बोनस देण्याची घोषणा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलीय. ते म्हणाले, पहिल्यांदाच सरकार सतत 6 वर्षापर्यंत बोनस देतेय. हा बोनस रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मेहनतीची गिफ्ट आहे. प्लॅस्टिक बंदीनंतर सुरू करा ‘हा’ व्यवसाय, होईल लाखोंची कमाई
11.52 lakh Railway employees to get 78 days wages as bonus. This is a reward for productivity: Union Minister @PrakashJavdekar#CabinetDecisions pic.twitter.com/uolfd2Q1io
— PIB India (@PIB_India) September 18, 2019
सणासुदीच्या अगोदर कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या बोनसमुळे बाजारात मागणी वाढण्याची शक्यता आहे. हा बोनस नाॅन गॅजेटेड कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. हा एक प्रकारचा प्राॅडक्टिव्हिटी लिंक्ड बोनस आहे. गेल्या वर्षी प्रत्येक कर्मचाऱ्याला जास्तीत जास्त 17951 रुपये मिळाले होते. ‘या’ बँकेत पैसे ठेवले तर मिळेल कॅशबॅक आणि सोबत भरपूर सुविधा दर वर्षी रेल्वे कर्मचाऱ्यांना दसऱ्याच्या पूजेच्या आधी बोनस दिला जातो. रेल्वेमध्ये प्राॅडक्टिविटी लिंक्ड बोनस 1979मध्ये सुरू झाला. पहिल्यांदा 72 दिवसांच्या पगाराबरोबर बोनस दिला जायचा. जानेवारीनंतर आज सर्वात महाग झालं पेट्रोल आणि डिझेल, ‘हे’ आहेत आजचे दर दर वर्षी राज्य आणि केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देते. असं म्हणतात, रेल्वेनंतर केंद्र आणि राज्य सरकारही लवकरच आपल्या कर्मचाऱ्यांना आकर्षक बोनस देणार आहेत. SPECIAL REPORT: नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशानंतर युती तुटणार का?