जानेवारीनंतर आज सर्वात महाग झालं पेट्रोल आणि डिझेल, 'हे' आहेत आजचे दर

जानेवारीनंतर आज सर्वात महाग झालं पेट्रोल आणि डिझेल, 'हे' आहेत आजचे दर

Petrol, Diesel - आजही पेट्रोल-डिझेल महाग झालंय. जाणून घ्या दर

  • Share this:

मुंबई, 18 सप्टेंबर : सौदी अरामकोवर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडलेत. याचा परिणाम घरगुती बाजारात पाहायला मिळालाय. दिल्लीत गेले 2 दिवस पेट्रोल-डिझेलच्या किमती 39 पैसे प्रति लीटर महाग झाल्यात. जानेवारीनंतर  पहिल्यांदा पेट्रोल इतकं महाग झालंय. दिल्लीत पेट्रोल 25 पैसे प्रति लीटर होऊन ते 72.42 रुपये आणि डिझेल 65.82 रुपये झालंय.

आज (18 सप्टेंबर) पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले पाहायला मिळाले. पेट्रोल 14 पैसे प्रति लीटर आणि डिझेल 16 पैसे प्रति लीटर महाग झालंय.

नोकरदारांना दिवाळीआधी PF मध्ये मिळणार 'इतका' फायदा

इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई इथे पेट्रोलचे दर क्रमश: 72.42 रुपये, 78.10 रुपये, 75.14 रुपये आणि 75.26 रुपये प्रति लीटर झालेत. तर डिझेलचे दरही क्रमश: 65.82 रुपये, 69.04 रुपये, 68.23 रुपये आणि 69.57 रुपये प्रति लीटर आहेत.

खूशखबर! सोन्या-चांदीच्या किमती झाल्या कमी, 'हे' आहेत मंगळवारचे दर

रोज पेट्रोल - डिझेलच्या किमतींचं समीक्षण करून सकाळी 6 वाजता नव्या किमती घोषित करतात. या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकन डाॅलर्सचे भाव यावर ठरवल्या जातात. मूळ किंमतींमध्ये अबकारी कर (excise duty), डीलर कमीशन या सर्व बाबी मिळून इंधनाच्या दरामध्ये वाढ होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीवर भारतात पेट्रोल-डिझेलचे दर अवलंबून असतात.

... म्हणून सलग 4 दिवस आहेत बँका बंद

आपल्या शहरातील इंधनाचे दर असे तपासा

विशेष नोंदणीकृत क्रमांकावर SMS पाठवून तुम्हाला तुमच्या शहरातील इंधनाच्या दरांबाबत माहिती मिळवता येईल. पण ही सुविधा आपल्या फोनवरून उपलब्ध व्हावी, यासाठी एसएमएस पाठवण्यापूर्वी तुम्हाला कोणत्याही पेट्रोल पंपावरून डीलर कोड घ्यावा लागेल. SMS सुविधा मिळवण्यासाठी कोड असणं आवश्यक आहे.

बीपीसीएल ग्राहक  RSP<डीलर कोड> 9223112222

एचपीसीएल ग्राहक HPPRICE<डीलर कोड> 9222201122

या क्रमांकावर सुविधा पाठवून तुम्हाला इंधनाचे दर स्मार्टफोनवरच मिळवता येतील.

SPECIAL REPORT: भुजबळ आणि राणेंच्या पक्ष प्रवेशावर भाजप सेनेतही चेकमेट!

First published: September 18, 2019, 11:21 AM IST
Tags: petrol

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading