जाहिरात
मराठी बातम्या / मनी / लॉकडाऊन संपल्यावर 15 एप्रिलपासून सुरू होणार रेल्वे? सरकारने दिलं हे स्पष्टीकरण

लॉकडाऊन संपल्यावर 15 एप्रिलपासून सुरू होणार रेल्वे? सरकारने दिलं हे स्पष्टीकरण

मंगळवारी खासगी रेल्वेसाठी लिलाव करण्यापूर्वी कंपन्यांसह पहिल्या बैठकीत 16 कंपन्या सहभागी झाल्या. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यात बॉम्बर्डिअर, कॅप इंडिया, आय-स्कायर कॅपिटल, IRCTC, BHEL, स्टर लाइट, मेधा, वेदांता, टेटला गर, BEML आणि RK असोसिएशन यांचा सहभाग आहे.

मंगळवारी खासगी रेल्वेसाठी लिलाव करण्यापूर्वी कंपन्यांसह पहिल्या बैठकीत 16 कंपन्या सहभागी झाल्या. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यात बॉम्बर्डिअर, कॅप इंडिया, आय-स्कायर कॅपिटल, IRCTC, BHEL, स्टर लाइट, मेधा, वेदांता, टेटला गर, BEML आणि RK असोसिएशन यांचा सहभाग आहे.

भारतीय रेल्वे सेवा 15 एप्रिलपासून सुरू होणार अशा बातम्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरत आहेत. तर याबाबत रेल्वे मंत्रालयाने स्पष्टीकरण दिलं आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 05 एप्रिल : कोरोना व्हायरच्या (Coronavirus) संक्रमणामुळे देशभरात 21 दिवसांचा लॉकडाऊन आहे. 14 एप्रिलपर्यंत ही लॉकडाऊनची परिस्थिती असणार आहे. अशावेळी 15 एप्रिलपासून अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त इतर सेवा सुरू होणार का असा सवाल विचारण्यात येत आहे. दरम्यान बंद असणारी भारतीय रेल्वे सेवा 15 एप्रिलपासून सुरू होणार अशा बातम्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरत आहेत. तर याबाबत रेल्वे मंत्रालयाने स्पष्टीकरण दिलं आहे. रेल्वे मंत्रालयाकडून (Ministry of Railway) शनिवारी स्पष्ट करण्यात आले आहे की, 15 एप्रिलपासून रेल्वे सुरु करण्याबाबत अजून कोणताही निर्णय झालेला नाही आहे आणि याबाबत नंतर निर्णय घेण्यात येईल. (हे वाचा- लवकरच होऊ शकते दुसऱ्या आर्थिक पॅकेजची घोषणा, PMO आणि अर्थ मंत्रालय अ‍ॅक्शनमध्ये ) रेल्वे मंत्रालयाने ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. पसरलेल्या अफवांमुळे 15 एप्रिलपासून प्रवास करण्याची तयारी अनेकांनी सुरू केली होती. त्यामुळे मंत्रालयाकडून असं स्पष्टीकरण देण्यात आले आहे की, अद्याप रेल्वेसेवा पूर्ववत करण्यासंदर्भात कोणताही आदेश आलेला नाही. यावर घेतलेल्या निर्णयाबाबत अधिकृतरित्या सूचना देण्यात येतील.

जाहिरात

रेल्वेकडून तयारीला सुरूवात मात्र दुसरीकडे पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार रेल्वेचे सुरक्षा कर्मचारी, स्टाफ, गार्ड, टीटीई आणि अन्य अधिकाऱ्यांना 15 एप्रिलपासून कामावर रुजू होण्यासाठी तयार राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार सर्व 17 झोनना संपूर्ण तयारी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (हे वाचा- PM Cares Fund च्या बनावट खात्यांपासून सावधान! 9 पेक्षा जास्त खोटे UPI ID ) अहवालात सांगण्यात आले आहे की, रेल्वेने प्रशिक्षित ड्रायव्हर, गार्ड, स्टेशन मास्टर आणि अन्य कर्मचाऱ्यांना वेळापत्रक पाठवलं आहे. रेल्वे बोर्डाने सर्व 17 झोनपासून रेल्वे सुरू करण्याच्या तयारीत राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात