मराठी बातम्या /बातम्या /मनी /

ही दिग्गज कंपनी कर्मचाऱ्यांना देणार 100000 रुपयांपेक्षा जास्त Pandemic Bonus! वाचा सविस्तर

ही दिग्गज कंपनी कर्मचाऱ्यांना देणार 100000 रुपयांपेक्षा जास्त Pandemic Bonus! वाचा सविस्तर

Coronavirus Pandemic Bonus: दिग्गज टेक कंपनी असणाऱ्या मायक्रोसॉफ्टने त्यांच्या कर्मचाऱ्यांना पँडेमिक बोनस देण्याची घोषणा केली आहे.

Coronavirus Pandemic Bonus: दिग्गज टेक कंपनी असणाऱ्या मायक्रोसॉफ्टने त्यांच्या कर्मचाऱ्यांना पँडेमिक बोनस देण्याची घोषणा केली आहे.

Coronavirus Pandemic Bonus: दिग्गज टेक कंपनी असणाऱ्या मायक्रोसॉफ्टने त्यांच्या कर्मचाऱ्यांना पँडेमिक बोनस देण्याची घोषणा केली आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 10 जुलै: कोरोना काळात (Coronavirus Pandemic) जगभरातील विविध क्षेत्रांचं नुकसान झालं आहे. व्यापाराला उतरती कळा लागली आहे, अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांचं (Economy) कंबरडं मोडलं आहे. या पँडेमिक काळाचा विशेष फटका कर्मचारी वर्गाला बसला आहे. कारण अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेकांची पगारवाढ थांबली. छोटे व्यापारी देखील कोरोनाच्या या संकटाशी जुळवून घेत व्यवसाय पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान अशाप्रकारे जोरदार फटका बसलेल्या व्यक्तींना मदत करण्यासाठी जगभरातील अनेक कंपन्या पुढे सरसावल्या आहे. टेक जायंट असणाऱ्या मायक्रोसॉफ्टने (Microsoft) देखील या काळात एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.

दिग्गज टेक कंपनी असणाऱ्या मायक्रोसॉफ्टने त्यांच्या कर्मचाऱ्यांना पँडेमिक बोनस देण्याची घोषणा केली आहे. द वर्ज द्वारे रिव्ह्यू करण्यात आलेल्या एका इंटरनल प्रॉपोजलनुसार, बोनसची रक्कम $ 1,500 असेल आणि ती 31 मार्च, 2021 किंवा त्यापूर्वी काम सुरू करणाऱ्या कॉर्पोरेट उपाध्यक्ष लेव्हलखालच्या सर्व कर्मचार्‍यांना दिली जाईल. अर्धवेळ कर्मचारी आणि मायक्रोसॉफ्टबरोबर तासाच्या हिशोबाने काम करणाऱ्या कर्मचार्‍यांनाही बोनस देण्यात येईल.

हे वाचा-Cairn Energy: या देशात भारतीय मालमत्ता जप्त? मोदी सरकारनं दिलं हे स्पष्टीकरण

29 मार्चपासून सहा चरणात हायब्रीड वर्कप्लेसची कार्यप्रणाली अवलंबून मायक्रोसॉफ्टने रेडमंड, वॉशिंग्टन स्थित मुख्यालय आणि आसपासचा परिसर हळूहळू पुन्हा उघडण्यास सुरुवात केली आहे, त्यानंतर कंपनीने त्यांच्या उद्घाटन कार्यालयाचे उद्धाटनही पुढे ढकलले आहे. सध्या मायक्रोसॉफ्टची 21 देशात कामाची ठिकाणं आहेत.

हे वाचा-SBI Alert: 10-11 तारखेला कोट्यवधी ग्राहकांना मिळणार नाहीत महत्त्वाच्या सेवा

बोनसकरता पात्र नाहीत सहाय्यक कंपन्या

अहवालात म्हटल्यानुसार, 'मायक्रोसॉफ्टचे चीफ पब्लिक ऑफिसर, कॅथलीन होगन यांनी आज कर्मचार्‍यांना ही भेट जाहीर केली आणि ती अमेरिकेतील आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्व पात्र कर्मचार्‍यांना लागू होईल'. अहवालात असेही नमूद करण्यात आले आहे की, मायक्रोसॉफ्ट जगभरातील 175,508 लोकांना रोजगार देते. मात्र या बोनसकरता लिंक्डइन, गिटहब आणि जेनीमॅक्स सारख्या सहाय्यक कंपन्या पात्र नसतील.

First published:

Tags: Coronavirus, Microsoft, Money, Pandemic