मराठी बातम्या /बातम्या /मनी /

चीनला मोठा झटका! भारतीय इलेक्ट्रिक इंडस्ट्रीने रद्द केल्या अनेक ऑर्डर्स, होणार कोट्यवधींचं नुकसान

चीनला मोठा झटका! भारतीय इलेक्ट्रिक इंडस्ट्रीने रद्द केल्या अनेक ऑर्डर्स, होणार कोट्यवधींचं नुकसान

 गेल्या काही दिवसात भारतीय इलेक्ट्रिकल इक्विपमेंट आणि इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्रीने चिनी कंपन्यांच्या ऑर्डर्स मोठ्या प्रमाणात रद्द करण्यास सुरूवात केली आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 21 जुलै : भारत आणि चीममधील वाढत्या संघर्षानंतर (India China Rift) भारताकडून चीनमधून मागवण्यात येणारे सामान बहिष्कृत केले जात आहे. एका मीडिया अहवालातील वृत्तानुसार गेल्या काही दिवसात भारतीय इलेक्ट्रिकल इक्विपमेंट आणि इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्रीने चिनी कंपन्यांच्या ऑर्डर्स मोठ्या प्रमाणात रद्द करण्यास सुरूवात केली आहे. आता या ऑर्डर्ससाठी नवीन पर्याय शोधण्यात येत आहे. या कंपन्या मुख्यत्वे पॉवर डिस्ट्रिब्यूशन आणि ट्रान्समिशन गिअरच्या ऑर्डर्स रद्द करत आहेत. इतर देशामध्ये यांची किंमत जरी अधिक असली तरी त्याठिकाणाहून या ऑर्डर्स मागवण्यात येणार आहेत. टाइम्स ऑफ इंडियामध्ये यासंदर्भात वृत्त देण्यात आले आहे.

(हे वाचा-1,41,66,26,55,00,000! Amazon संस्थापकांच्या संपत्तीचा आकडा मोजताना होईल दमछाक)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर होण्याचा आवाहन केल्यानंतर यासंदर्भातील पावलं उचलण्यास सुरुवात झाली आहे.

चीनकडून मागवण्यात येते हे सामान

या मीडिया अहवालानुसार इंडियन इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशन (Indian Electrical & Electronics Manufacturers Association IEEMA) चे अध्यक्ष आरके चुघ यांनी अशी माहिती दिली आहे की, इंडस्ट्रीमध्ये कच्च्या मालाव्यतिरिक्त सुद्धा इतर सामान चीनवरून मागवण्यात येत होते. IEEMA चे डिरेक्टर जनरल सुनील मिश्रा यांनी अशी माहिती दिली आहे की, इंडस्ट्री सध्या पर्याय शोधत आहे, जेणेकरून चीनकडून होणारा हा पुरवठा थांबवण्यात येईल.

(हे वाचा-पैसे सुरक्षित ठेवायचे आहेत तर ऐका SBI चा हा सल्ला, अन्यथा होईल खाते रिकामे)

जोपर्यंत आपण पू्र्णपणे आत्मनिर्भर होत नाही तोपर्यंत या सामानाचा पुरवठा करणारे मित्रदेश अर्थात जपान, तैवान, कोरिया आणि जर्मनीमधून त्याची मागणी केली जाईल. सॉफ्टवेअरची आयात यूरोपमधून केली जाऊ शकते तर इतर कच्च्या मालासाठी रशिया, चेक रिपब्लिक आणि पोलंडकडे मागणी केली जाऊ शकते.

First published: