मुंबई, 19 जानेवारी: नव्या वर्षाची सुरुवात देश आणि जगातील अनेक मोठ्या टेक कंपन्यांसाठी खूपच वाईट झाली आहे. जगातील आगामी जागतिक मंदीच्या भीतीमुळे टेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यास सुरुवात केली आहे. Google आणि Facebook कंपनीने त्यांच्या हजारो कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून दिले आहे आणि आता या यादीत मायक्रोसॉफ्टही सामील झाली आहे. जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांपैकी एक असलेली मायक्रोसॉफ्ट या वर्षी आपल्या 10,000 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार आहे. कंपनीचे भारतीय वंशाचे सीईओ सत्या नडेला यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात याची पुष्टी केली आहे. यासोबतच त्यांनी कर्मचाऱ्यांना काय सांगितले याविषयी आपण जाणून घेणार आहोत.
सत्या नडेला यांनी कर्मचाऱ्यांसाठी लिहिलेल्या ब्लॉगपोस्टमध्ये म्हटले आहे की, कंपनीची आर्थिक स्थिती आणि ग्राहकांच्या बदलत्या पसंती लक्षात घेऊन हे केले जात आहे. यासोबतच कंपनी दीर्घकालीन उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करत पावले उचलत आहे असे देखील ते म्हणाले.
तुमच्या मुलांचे Bank Account सुरु करण्याचा विचार करताय? मग हे वाचाच
सत्या नडेला यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, आम्ही मोठ्या बदलाच्या काळातून जात आहोत. मी ग्राहक आणि पार्टनर्सला भेटत असल्याने काही गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे ग्राहकांनी महामारीच्या काळात डिजिटल सामग्रीवर त्यांचा खर्च झपाट्याने वाढवला होता, परंतु आता ते हे बदलत आहेत आणि कमी खर्चात अधिक काम करू इच्छित आहेत. जगभरातील विविध क्षेत्रातील कंपन्या अत्यंत सावधपणे पावले उचलत असल्याचेही आपण पाहत आहोत. कारण अनेक देशांमध्ये मंदी आली आहे आणि ती इतर अनेक देशांमध्ये येण्याची शक्यता आहे.
Amazon च्या कर्मचाऱ्यांवरील संकट कायम! 2300 जणांना वॉर्निंग नोटीस
त्याच बरोबर, AI मधील प्रगतीसह, कंप्यूटिंग एक नवीन लाट देखील निर्माम होत आहे. आपण जगातील सर्वात प्रगत मॉडेलला नवीन कंप्यूटिंग प्लॅटफॉर्ममध्ये रूपांतरित करण्याच्या मार्गावर आहोत. या गोष्टींच्या आधारे, कंपनी म्हणून आम्हाला परिणाम देणे तसेच दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी गुंतवणूक करणे सुरू ठेवायचे आहे. मला खात्री आहे की मायक्रोसॉफ्ट या परिस्थितीतून मजबूत होऊन बाहेर येईल, परंतु यासाठी आपल्याला 3 प्राधान्यक्रम लक्षात घेऊन काही निर्णय घ्यावे लागतील.
प्रथम आम्ही आमच्या कॉस्ट स्ट्रक्चर हे रेवेन्यूसोबत जुळवून घेऊ. आम्ही काही विभागांमध्ये नोकऱ्या कमी करत आहोत. तर काही महत्त्वाच्या धोरणात्मक विभागांमध्येही भरती केली जाईल. आम्हाला माहित आहे की याचा परिणाम होणार्या प्रत्येकासाठी ही एक आव्हानात्मक वेळ आहे. ही प्रक्रिया अत्यंत विचारपूर्वक आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण केली जाईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Business, Business News, Microsoft