मुंबई, 15 जून : तुमची कार तुमच्याशी बोलली तर कसं वाटेल? ही काही थट्टा नाही. अशी एक कार लवकरच लाँच होतेय. MG मोटरची हेक्टर तुमच्याशी बातचीत करेल. इतकंच नाही तर तुम्ही दिलेल्या कमाण्ड फाॅलो करेल. कंपनी या कारला i smart कार असं संबोधतेय.
4 जूनपासून या कारचं बुकिंग सुरू झालंय. या कारची विक्री जूनच्या शेवटी सुरू होईल. MG हेक्टरची किंमत 15 ते 21 लाखाच्या मधे असेल. जाणून घेऊ या कारच्या लूक आणि इंजिनबद्दल
UIDAI ची खास भेट, 'इथे' तयार करून मिळेल आधार कार्ड
कारचा आतला लूक
MG Hector मध्ये प्रीमियम क्वालिटी इंटिरियर असेल. डॅशबोर्ड साॅफ्ट टच मटेरियल असेल. स्टीयरिंग आणि गियर लीवरच्या नाॅबवर व्हील लेदरचं रॅपिंग आहे. सोबत सीटही लेदरचीच असेल. एमजी हेक्टर 10.4 इंचाचं व्हर्टिकल ओरिएंटेड टच स्क्रीन इंफोटेन्मेंट सिस्टम आहे. ही सिस्टम Android Auto आणि Apple CarPlay दोघांनाही सपोर्ट करते.सोबत कंपनीचं iSmart इंटरफेसही असेल. त्याला जोडलेले बरेच स्मार्ट फीचर्स असतील.
नव्या अर्थमंत्र्यांकडून देशाला हवेत 'हे' 10 बदल
कारचं बाह्यरूप
ही कार बाहेरून SUV चायनीज कार Baojun 530 सारखी दिसते. समोर LED डेटाइम रनिंग लॅम्प्स, मुख्य हेडलॅम्प्सच्या वर दिलेत. सोबत मोठं क्रोम ग्रिल आहे. बाजूला SUVचं डिझाइन दिलंय. मागे डिझाइनमध्ये LED टेल लॅम्प्स, faux skid प्लेट मुख्य आहे.
मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची मोठी संधी, 'असा' करा अर्ज
देशाची पहिली इंटरनेट कार
एमजी हेक्टर इंटरनेटशी जोडली आहे. हेक्टरमध्ये नेक्स्ट जनरेशन आॅटोमोटिव्ह असिस्टंट आहे. ते 100 टक्के बटण फ्री आहे. ती आवाज ओळखू शकते. MG Hectorमध्ये iSmart इंटरफेस आहे. तो साॅफ्टवेअर, हार्डवेअर आणि कनेक्टिव्हिटी पर्याय घेऊन येतो. MG Hector ग्लेज रेड, बर्गंडी रेड, स्टॅरी ब्लॅक, आॅरोरा सिल्व्हर आणि कँडी व्हाइट रंगांमध्ये उपलब्ध आहे.
इंजिन
एमजी हेक्टर पेट्रोल आणि डिझेल दोन्हीमध्ये मिळेल. कारचं पेट्रोल इंजिन 1.5- लीटर आहे. त्याची पाॅवर 143hp आहे आणि 250Nm टॉर्क जेनरेट करते. 2.0- लीटर डिझेल इंजिन 170hp पाॅवर आणि 350Nm टॉर्क जेनरेट करतात. दोन्ही इंजिन बीएस 4 आहे. पेट्रोल इंजिनमध्ये 6- स्पीड आॅटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय आहे.
MG Hecotr कारसाठी चोविस तास असिस्टंट उपलब्ध असेल. जर अपघात झालाच तर एअरबॅग्ज आपोआप उघडतील. शिवाय मेसेजही जाईल आणि आणीबाणीच्या काळात काय करावं याही सूचना मिळतील.
VIDEO : उदयनराजे आणि रामराजेंच्या वादात शिवेंद्रराजेंचीही उडी, म्हणाले...