मुबंई, 12 जुलै : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने योग्य ते निर्णय वेळोवेळी घेत असते आणि त्यासंबंधीच्या सूचना बँकांना देत असते. मात्र सोशल मीडियाच्या (Social Media) युगात असे काही मेसेज व्हायरल (Viral Message) होतात की त्यांची खातरजमा करणे गरजेचं असतं. एटीएममधून पैसे काढण्यासंदर्भात (ATM Transaction) असाच एक मेसेज गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात एटीएममधून पैसे काढल्यास 173 रुपये शुल्क आकारलं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. RBI आणि केंद्र सरकार बँकांच्या विविध सेवा शुल्कांबाबत वेळोवेळी निर्णय घेत असतात. कोणत्याही प्रकारच्या बदलाची माहिती आरबीआय किंवा बँकां त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर देत असतात. मात्र आता एटीएममधून एकूण 4 वेळा पैसे काढल्यानंतर ग्राहकांना त्यानंतरच्या प्रत्येक व्यवहारासाठी एकूण 173 रुपये द्यावे लागतील, असा मेसेज व्हायरल झाला आहे. तुम्हालाही हा व्हायरल मेसेज आला असेल, तर तुम्हीही या मेसेजची सत्यता जाणून घेतली पाहिजे. आता कोणत्याही ग्राहकाच्या एटीएममधून 4 पेक्षा जास्त वेळा पैसे काढल्यास त्यानंतर प्रत्येक व्यवहारावर त्याच्या खात्यातून 173 रुपये कापले जातील. यात 150 रुपये टॅक्स आणि 23 रुपये सर्व्हिस चार्ज यांचा समावेश आहे. पीआयबीने फॅक्ट चेकने या मेसेजमधील हा दावा खोटा असल्याचे सांगितले आहे. रिझर्व्ह बँकेची तीन बँकांवर मोठी दंडात्मक कारवाई, तुमचंही ‘या’ बँकांमध्ये खातं आहे का? नियमानुसार तुमच्या बँकेच्या ATM मधून दर महिन्याला 5 मोफत व्यवहार करता येतील. यानंतर, प्रत्येक व्यवहारासाठी जास्तीत जास्त 21 रुपये आणि कोणताही कर असल्यास तो स्वतंत्रपणे भरावा लागेल.
दावा: ATM से 4 से अधिक बार पैसे निकालने पर ₹173 काटे जाएंगे। #PIBFactCheck
— PIB Fact Check (@PIBFactCheck) July 11, 2022
▶️यह दावा फर्जी है।
▶️अपने बैंक के ATM से हर माह 5 मुफ्त ट्रैन्ज़ैक्शन किए जा सकते हैं।
▶️इसके बाद अधिकतम ₹21/ट्रांजैक्शन या कोई टैक्स होने पर वह अलग से देना होगा।
🔗https://t.co/nkl0LBZOHN pic.twitter.com/AAWcNxd63r
आपल्या बँक खात्यातील शिल्लक एटीएममधून तपासण्यापासून ते मिनी स्टेटमेंट किंवा पिन बदलण्यापर्यंत सर्व गैर-आर्थिक व्यवहार विनामूल्य राहतील. 6 मेट्रो शहरे मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू आणि हैदराबाद येथे 3 व्यवहार विनामूल्य आहेत आणि त्यावरील तुम्हाला शुल्क भरावे लागेल. बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांना झटका, बँकेचं MCLR वाढवल्याने कर्ज महाग होणार, EMI वाढणार तर नॉन मेट्रो शहरांमध्ये ग्राहकांना 5 एटीएम व्यवहार मोफत आहेत. यानंतर प्रति व्यवहार 21 रुपये आणि नॉन फायनान्शिय ट्रान्झॅक्शनसाठी 8.50 रुपये द्यावे लागतील. त्यामुळे एटीएममधील व्यवहारांवर 173 रुपये शुल्क आकारण्याचा व्हायरल मेसेज खोटा असल्याचं सिद्ध झालं आहे.