नवी दिल्ली, 12 ऑगस्ट: घर घेण्याचं स्वप्न असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. या आठवड्यात तुम्हाला देशातील दोन महत्त्वाच्या बँका स्वस्तात घर घेण्याची संधी उपलब्ध करून देत आहेत. जर तुमची घर, दुकान किंवा शेतीसंबंधित जमीन घेण्याचा विचार असेल तर तुमच्याकडे एक चांगली संधी आहे. पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) आणि बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) या मालमत्तांची विक्री करत आहे. या दोन्ही बँकांकडून रेसिडेन्शिअल, कमर्शिअल, इंडस्ट्रिअल आणि अॅग्रीकल्चरल प्रॉपर्टीचा ई-लिलाव (Mega E-Auction) केला जाणार आहे. जाणून घ्या तुम्ही देखील कशाप्रकारे या ई-लिलावामध्ये सहभाग घेऊ शकता.
PNB मेगा ई-ऑक्शन
पीएनबी मेगा ई-ऑक्शन आज 12 ऑगस्ट रोजी होणार आहे. अर्थात उद्या तुम्हाला स्वस्त प्रॉपर्टी खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. या लिलावात रेसिडेन्शिअल, कमर्शिअल, इंडस्ट्रिअल आणि अॅग्रीकल्चरल प्रॉपर्टीची विक्री केली जात आहे. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार यामध्ये बोली लावू शकता. बँकेने ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे.
Looking for residential and commercial properties at reasonable rates?
PNB's Mega e-Auction gives you just the right opportunity. Date: August 12 Portal: https://t.co/N1l10rJGGS pic.twitter.com/hqEl5MmsDy — Punjab National Bank (@pnbindia) August 4, 2021
पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) 18300 पेक्षा जास्त रहिवासी, व्यापारी, औद्योगिक आणि कृषी संबंधित मालमत्तेची विक्री करत आहे.
हे वाचा-'या' कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या महिन्यात वाढीव DA सह येणार एक्स्ट्रा पगार
बँक ऑफ बडोदा मेगा ई-ऑक्शन
PNB नंतर बँक ऑफ बडोदा देखील 18 ऑगस्ट रोजी मेगा ई-ऑक्शन करणार आहे. बँकेने याआधी 28 जुलै रोजी अशाप्रकारे मालमत्तांचा ई-लिलाव केला होता.
Your dream of owning a property anywhere in India is just a few days away. Make the most of #BankofBaroda Mega e-Auction and purchase the property of your choice with ease. Know more https://t.co/ejge3HE0ms pic.twitter.com/G0XgrsJmcl
— Bank of Baroda (@bankofbaroda) August 10, 2021
बँकेने ट्वीट करत अशी माहिती दिली आहे की बँक ऑफ बडोदा हा लिलाव SARFAES कायद्याअंतर्गत करत आहे. यामध्ये घर, ऑफिस, इंडस्ट्रिअल प्रॉपर्टी, जमीन, प्लॉट इ. मालमत्तांची विक्री होणार आहे. ज्या प्रापर्टीच्या मालकांनी त्या जागेचं कर्ज फेडलं नसेल किंवा एखाद्या कारणाने ते कर्ज देऊ शकत नसतील, त्या सर्वांची प्रापर्टी बँकेद्वारा जप्त केली जाते. बँकांकडून वेळोवेळी अशा प्रॉपर्टीचा लिलाव केला जातो. या लिलावात बँक अशा प्रापर्टी विकून आपली रक्कम वसूल करुन घेतात.
हे वाचा-PNB ग्राहकांसाठी मोठी बातमी! 1 सप्टेंबरपासून होणार बचत खात्यावरील व्याजदरात बदल
दोन्ही मेगा-ई ऑक्शनसाछी कशाप्रकारे कराल रजिस्ट्रेशन?
बिडरला आपल्या मोबाईल नंबर आणि Email ID चा वापर करुन E-Auction प्लॅटफॉर्मवर रजिस्ट्रेशन करावं लागेल. eBkray पोर्टल bवर 'बिडर्स रजिस्ट्रेशन' सेक्शनमध्ये जाऊन रजिस्ट्रेशन करता येईल. यानंतर बिडरला KYC डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील. KYC डॉक्युमेंट E-Auction सर्विस प्रोवाइडर द्वारा व्हेरिफिकेशन केलं जाईल. यासाठी कमीत-कमी दोन वर्किंग डे इतका वेळ लागू शकतो. E-Auction प्लॅटफॉर्मवर जनरेट झालेल्या चालानचा वापर करुन अमाउंट ट्रान्सफर करावी लागेल. यासाठी NEFT किंवा ऑनलाईन-ऑफलाईन ट्रान्सफरचाही वापर करता येऊ शकतो. इच्छुक रजिस्टर करणारे पहिला, दुसरा आणि तिसरा टप्पा पूर्ण केल्यानंतर E-Auction प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन बोली लावू शकतात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.