मराठी बातम्या /बातम्या /मनी /

7th Pay Commission: 'या' कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या महिन्यात वाढीव DA सह येणार एक्स्ट्रा पगार

7th Pay Commission: 'या' कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या महिन्यात वाढीव DA सह येणार एक्स्ट्रा पगार

केंद्रीय कर्मचाऱ्यांना वाढीव डीए (Dearness Allowance) मिळणार असल्याच्या बातमीनंतर आता PSU सेक्टरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील मोदी सरकारने खूशखबर दिली आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 11 ऑगस्ट: कोरोना काळात (Coronavirus in India) सरकारी कर्मचाऱ्यांना (Benefits for Government Employees) सरकारकडून अनेक फायदे उपलब्ध झाले आहेत. केंद्रीय कर्मचाऱ्यांना वाढीव डीए (Dearness Allowance) मिळणार असल्याच्या बातमीनंतर आता पब्लिक सेक्टर यूनिट्स (Public Sector Units PSU) बँकेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील मोदी सरकारने खूशखबर दिली आहे. PSU क्षेत्रात काम करणाऱ्या 8 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांच्या महागाई हप्त्यात सरकारने वाढ (7th Pay Commission DA Hike) केली आहे. कर्मचाऱ्यांच्या ऑगस्ट महिन्याच्या पगारात वाढीव महागाई भत्ता देखील जोडला जाईल. या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2.10 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.

PSU सेक्टरच्या कर्मचाऱ्यांचा डीए ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2021 साठी वाढवण्यात आला आहे. ही वाढ केवळ तीन महिन्यासाठी असणार आहे. AIACPI (All India Average Consumer Price Index) च्या आकडेवारीच्या आधारे हे निश्चित करण्यात आले आहे.

हे वाचा-छोट्या दुकानदारांसाठी मोठी बातमी! आता E-Commerce कंपन्यामुळे होणार नाही नुकसान

PSU (पब्लिक सेक्टर यूनिट्स) मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याचं कॅलक्यूलेशन अशाप्रकारे केलं जातं- महागाई भत्ता टक्केवारी=(गेल्या तीन महिन्यांची ग्राहक मुल्य निर्देशांकाची सरासरी (बेस इयर 2001=100)-126.33))x100

कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळेल फायदा?

PSU कर्मचाऱ्यांचा पगार वेगवेगळ्या कॅटेगरीच्या हिशोबाने होतो. यामध्ये बँक PO (Probationary Officer) चा पगार 40 ते 42 हजार रुपये महिना असतो. यामध्ये 27,620 रुपये बेसिक सॅलरी आहे. यावर डीएमध्ये 2.10 टक्क्यांची वाढ झाली आहे. PO साठी सर्व्हिस हिस्ट्रीचा नियम असा आहे की संपूर्ण सर्व्हिस दरम्यान कर्मचाऱ्याला 4 टक्के इन्क्रीमेंट देण्यात येते. प्रमोशनंतर जास्तीत जास्त बेसिक पगार 42020 होतो.

हे वाचा-याच आर्थिक वर्षात दोन सरकारी कंपन्या होणार खाजगी, काय आहे सरकारची योजना?

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 11 टक्क्यांची वाढ होऊन भत्ता 28 टक्के करण्यात आला आहे. याचं पेमेंट जुलैच्या पगारात करण्यात आलं आहे. दीड वर्ष सरकारने डीए फ्रीझ केला होता, हे निर्बंध आता सरकारने हटवले आहेत. दरम्यान अद्याप दीड वर्षांपासून अडकलेल्या महागाई भत्त्याच्या एरिअर संदर्भात कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

First published: