• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • PNB ग्राहकांसाठी मोठी बातमी! 1 सप्टेंबरपासून होणार बचत खात्यावरील व्याजदरात बदल

PNB ग्राहकांसाठी मोठी बातमी! 1 सप्टेंबरपासून होणार बचत खात्यावरील व्याजदरात बदल

Punjab National Bank पुढील महिन्यापासून बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याजदरात बदल करणार आहे. नवीन व्याजदर सध्याच्या आणि नव्या ग्राहकांना लागू होतील

 • Share this:
  नवी दिल्ली, 11 ऑगस्ट: सार्वजनिक क्षेत्रातील दुसरी मोठी बँक असणाऱ्या पंजाब नॅशनल बँकेच्या (Pubjab National Bank) ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या व्याजदरात 1 सप्टेंबरपासून बदल होणार आहे. Punjab National Bank पुढील महिन्यापासून बचत खात्यामध्ये जमा रकमेवर कपात करणार आहे. PNB च्या अधिकृत वेबसाइटवरून ही माहिती देण्यात आली आहे. बँकेचे नवीन व्याजदर 2.90 टक्के असणार आहेत, सध्या बँक बचत खात्यावरील रकमेवर 3 टक्के दराने व्याज देते. नवीन आणि जुन्या ग्राहकांवर होणार परिणाम PNB ने दिलेल्या माहितीनुसार, नवीन व्याजदर सध्याच्या आणि नव्या ग्राहकांना (Old and New Customers of PNB) लागू होतील. पंजाब नॅशनल बँक ही देशातील दुसरी मोठी सरकारी बँक आहे. देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (State Bank of India) ग्राहकांना बचत खात्यावर 2.70 टक्के दराने व्याज मिळते. हे वाचा-दरमहा EPF मध्ये पैसे जमा होत असतील मिळू शकेल 1.5 कोटींपेक्षा अधिकचा फायदा दरम्यान कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra Bank) आणि इंडसइंड बँक (IndusInd Bank) बचत खात्यावर सर्वाधिक अर्थात 4 ते 6  टक्के व्याज देऊ करतात. PNB मध्ये यूनायटेड आणि ओरिएंटल बँकेचे विलिनीकरण पंजाब नॅशनल बँकेमध्ये ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (oriental bank of commerce) आणि यूनायटेड बँक ऑफ इंडिया (United bank of India) चे विलिनीकरण झाले आहे. गेल्यावर्षी या दोन्ही बँकांचे PNB मध्ये विलिनीकरण झाले होते. आता या दोन्ही बँकांच्या शाखा पीएनबीच्या शाखेच्या स्वरुपात काम करतात.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: