मुंबई, 12 जानेवारी: आरोग्य विमा कंपनी (Health Insurance Company) स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्सने आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी व्हॉट्सअॅप सेवा सुरू केली आहे. या सुविधेमुळे ग्राहकांना घरबसल्या काही क्लिकमध्ये विमा पॉलिसी खरेदी करता येणार आहे. विशेष म्हणजे ते व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पॉलिसीसाठी क्लेम देखील करता येणार आहे. कोरोनाची (Coronavirus in India) वाढती प्रकरणं लक्षात घेता, स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्सने त्यांच्या ग्राहकांना खास सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ग्राहकांना सुरक्षित ठेवणे हे या मागचे उद्दिष्ट्य आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, स्टार हेल्थचे ग्राहक व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून एंड-टू-एंड सेवेचा लाभ घेऊ शकतात. स्टार हेल्थ रिटेल हेल्थ, ग्रुप हेल्थ, पर्सनल अॅक्सिडेंट आणि परदेश प्रवासासाठी विमा संरक्षण देते. भारतीय आरोग्य विमा बाजारात या कंपनीचा वाटा 15.8 टक्के आहे. हे वाचा- Crypto संस्थापक झाला जगातल्या सर्वात श्रीमंतांपैकी एक; असा घडला प्रवास कंपनीने सांगितले की, नवीन सुविधेचा लाभ घेण्यासाठी स्टार हेल्थच्या ग्राहकांना त्यांच्या व्हॉट्सअॅप नंबरवरून +91 95976 52225 वर ‘Hi’ असा मेसेज पाठवावा लागेल. या सेवेच्या मदतीने ग्राहक नवीन पॉलिसी घेऊ शकतात. तुम्ही कॅशलेस क्लेम देखील दाखल करू शकता. ग्राहक त्यांच्या सोयीनुसार पॉलिसी डॉक्युमेंट डाउनलोड करू शकतात. याशिवाय या कंपनीचे ग्राहक चॅट असिस्टंट-ट्विंकल, कस्टमर केअर क्रमांक, एजंट, अधिकृत वेबसाइट, ब्रांच ऑफिस आणि स्टार पॉवर अॅपच्या माध्यमातून वीमाकर्त्यापर्यंत पोहचू शकतात. या सुविधांचा वापर करून ग्राहक इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करू शकतात. हे वाचा- छोट्या व्यावसायिकांबाबत मोदी सरकार मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत, वाचा सविस्तर स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्सचे मॅनेजिंग डायरेक्टर आनंद रॉय यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे की, ‘व्हॉट्सअॅप विशेष लोकप्रिय आहे. त्याची पोहोच विस्तृत आहे. म्हणूनच आम्हाला विश्वास आहे की हा प्लॅटफॉर्म केवळ आम्हाला आमच्या ग्राहकांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा देण्यास मदत करणार नाही तर त्यांच्याशी आमची प्रतिबद्धता देखील वाढवेल. याच्या मदतीने आम्ही आमच्या पॉलिसीधारकांशी कधीही आणि कुठेही संपर्कात राहू शकू.’
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.