नवी दिल्ली, 12 जानेेवारी: भारतीय बाजारात सोन्याच्या किंमतीमध्ये वेगाने घसरण पाहायला मिळते आहे. मंगळवारी मल्टि कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) फेब्रुवारीसाठी सोन्याचे वायदा दर (Gold price today) 0.03 टक्क्याने प्रति तोळा कमी झाले आहेत. शिवाय चांदीच्या वायदे किंमतीतही (Silver Price Today) आज घसरण पाहायला मिळाली. चांदीचे दर 0.22 टक्के प्रति किलोनेे कमी झाले आहेत. शुक्रवारी झालेल्या मोठ्या4 घसरणीनंतर आधीच्या सत्रामध्ये सोन्याच्या किंमती 0.7 टक्के प्रति तोळाने वधारल्या होत्या. 2 हजार रुपयांनी उतरले होते दर शुक्रवारी 08 जानेवारी 2020 रोजी सोन्याचे फेब्रुवारीच्या सोन्याची वायदे किंमत (Gold Future) 2,068 रुपये प्रति तोळाने कमी होऊन दर 48,818 रुपयांवर पोहोचले होते. शिवाय सोमवारी देखील सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली. चांदीचेे दर देखील कमी झाले होते. (हे वाचा- Pockets वॉलेटमधून गॅस सिलेंडर बुक करुन असा मिळवा कॅशबॅक ) केंद्र सरकारने 2 लाख रुपयांपेक्षा जास्त सोने खरेदी करणाऱ्यांना आधार आणि पॅन कार्ड अनिवार्य केले आहे. ज्यानंतरच सोन्याचे दर कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. वाचा आज काय आहेत सोन्याचे दर? MCX वर आज फेब्रुवारीमधील सोन्याचा वायदा भाव 14 रुपये प्रति तोळाने कमी होऊन 49,328 रुपये झाला आहे. तर चांदीचे दर 155 रुपयांनी कमी होऊन 65,400 रुपये प्रति किलोग्राम झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याच्या किंमती वाढल्या होत्या, मात्र डॉलरचे मुल्य वधारल्यामुळे ही तेजी गायब झाली आहे. स्पॉट गोल्ड 0.2 टक्क्याने वाढून 1847.96 डॉलर प्रति औंस आहे तर चांदीचे दर 0.8 टक्क्यांनी वाढून 25.11 डॉलर प्रति औंस आहेत. (हे वाचा- SBI Alert: ATM चा वापर करताय? या 9 गोष्टी लक्षात ठेवाच; अन्यथा नुकसानीची शक्यता ) भारतीय वायदे बाजारात सोन्याचांदीच्या किंमती कमी होण्याचे सर्वात मोठे कारण असे आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावर दोन्ही किंमती धातूंची किंमत कमी झाल्या आहे. त्याचप्रमाणे अमेरिकन बाँडचे यील्ड वाढल्याने आणि डॉलरचे मुल्य वधारल्यामुळे दोन्ही मौल्यवान धातूंच्या किंमती कमी होत आहेत. सरकार देतंय स्वस्तात सोनंखरेदीची संधी मोदी सरकार पुन्हा एकदा स्वस्त दरात सोनं खरेदी करण्याची संधी देत आहे. जर तुम्हाला सोन्यात गुंतवणूक करायची असल्यास, 11 जानेवारी ते 15 जानेवारीपर्यत चांगली संधी आहे. सॉव्हरेन गोल्ड बाँडसाठी (Sovereign Gold Bond) सोन्याची किंमत 5,104 रुपये प्रति ग्रॅम निश्चित करण्यात आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकने शुक्रवारी ही माहिती दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.