नवी दिल्ली, 11 जानेवारी : घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती सतत वाढत आहेत. 14.2 किलोग्रॅम गॅस बुक केल्यास, जवळपास 694 रुपये भरावे लागतात. परंतु आता गॅस सिलेंडरवर कॅशबॅक मिळवण्याची संधी आहे. कॅशबॅक मिळवण्यासाठी गॅस सिलेंडरचं बुकिंग आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) पॉकेट्स वॉलेटद्वारे (Pockets) करावं लागेल.
असा मिळेल कॅशबॅक -
पॉकेट्स वॉलेटने दिलेल्या माहितीनुसार, या वॉलेटमधून गॅस बुकिंग केल्यास, 50 रुपये कॅशबॅक मिळणार आहे. हा कॅशबॅक त्याच ग्राहकांना मिळेल, जे जानेवारी महिन्यात पॉकेट्स अॅपद्वारे पहिल्यांदा गॅस बुकिंग किंवा बिल पेमेंट करतील. कॅशबॅक मिळवण्यासाठी PMRJAN2021 प्रोमो कोड टाकावा लागेल. यात 10 टक्क्यांच्या हिशोबाने 50 रुपयांचा कॅशबॅक मिळतोय. ही ऑफर 25 जानेवारी 2021 पर्यंत लागू आहे. या प्रोमो कोडचा वापर महिन्यातून तीन वेळा करता येऊ शकतो.
असं करा गॅस सिलेंडरचं बुकिंग -
- Pockets वॉलेट अॅप ओपन करुन त्यात Pay Bills वर क्लिक करावं लागेल.
- त्यानंतर Choose Billers मध्ये More ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा.
- त्यानंतर LPG चा पर्याय येईल.
- येथे सर्व्हिस प्रोव्हायरचा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर कंज्युमर नंबर, डिस्ट्रीब्यूटर आयडी आणि मोबाईल नंबर द्यावा लागेल.
- त्यानंतर PMRJAN2021 प्रोमो कोड टाकावा. बुकिंग अमाउंट सिस्टमद्वारा सांगितली जाईल आणि पेमेंट करावा लागेल.
- ट्रान्झेक्शन केल्यानंतर 10 दिवसांच्या आत 10 टक्के हिशोबाने 50 रुपये कॅशबॅक पॉकेट्स वॉलेटमध्ये क्रेडिट केला जाईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gas, Icici bank