मुंबई, 9 जुलै : मारुती 52 टक्के मार्केट शेअरसोबत देशातली सर्वात मोठी कार कंपनी आहे.देशात विकणाऱ्या गाड्यांपैकी प्रत्येक दुसरी गाडी मारुतीच आहे. तुम्हाला हे वाचून धक्का बसेल की गुंतवणूकदारांनी 2003मध्ये मारुतीच्या शेअरमध्ये 12 हजार रुपये गुंतवणूक केली असेल तर त्यांची गुंतवणूक जवळजवळ 6 लाख रुपये होते. मारुती शेअर बाजारात लिस्ट होऊन 16 वर्ष पूर्ण झालेत. 2003मध्ये आजच्याच दिवशी मारुतीची लिस्टिंग स्टाॅक एक्सचेंज बीएसई आणि एनएसईवर झाली होती. त्यावेळी सरकारनं आपला 25 टक्के हिस्सा विकला होता. आयपीओचा भाव 125 रुपये होता. एक्सचेंजवर 157 रुपये प्रति शेअरच्या भावानं लिस्टिंग झालं. कसा झाला गुंतवणूकदारांना फायदा? 9 जुलै 2003ला शेअर बाजारात मारुतीच्या शेअर्सची एंन्ट्री झाली. आयपीओ 125 रुपयाच्या दरावर होता. याची लिस्टिंग 157 रुपयांवर झाली. शेअरनं दोन वर्षांपूर्वी डिसेंबर 2017मध्ये 10 हजार रुपयांचा आॅल टाइम हाय गाठलं. देशाच्या इतर कंपन्यांप्रमाणे आॅटो विक्रीत घसरण झाल्यानं शेअर 6033 रुपयांवर आला होता. कंपनीनं 9 वर्ष प्रत्येक वर्षी डिव्हिडंड दिलाय. 2003मध्ये 12500 रुपये गुंतवणूक करणाऱ्यांचे पैसे 6 लाख रुपये झाले. यात डिव्हिडंडचा समावेश नाही. खासगी नोकरी करणाऱ्यांना सरकारची भेट, ‘इतका’ वाढणार पगार अशी सुरू झाली मारुती मारुतीची सुरुवात 16 नोव्हेंबर 1970 रोजी झाली. पहिल्यांदा मारुतीचं नाव मारुति टेक्निकल सर्विसेज प्रायव्हेट लिमिटेड होतं. ही कंपनी देशी कार बनवणाऱ्यांना सर्व तंत्रज्ञान उपलब्ध करून द्यायची. जून 1971मध्ये मारुती लिमिटेड कंपनी बनली. संजय गांधी त्याचे पहिले मॅनेजिंग डायरेक्टर होते. सोनिया गांधी आणि एमटीएसपीएसच्या मधे 1973मध्ये करार झाला. संजय गांधी मारुती लिमिटेडचे एमडी झाले. आजपासून ‘या’ कंपनीची स्कुटर आणि बाइक झाली महाग सोनिया गांधींना मारुती द्यायची पगार सोनिया गांधी आणि संजय गांधी यांचा पाच वर्ष पगार 2 हजार रुपये होता. शिवाय कमिशन आणि इतर फायदे मिळत होते. पावसाळ्यात सुरू करा ‘हा’ व्यवसाय, रोज 5 ते 10 हजाराची होईल कमाई 1975मध्ये एमटीएसपीएल आणि मारुति लिमिटेडची सहाय्यक कंपनी मारुती हॅवी प्रा. लि. सोबत एक करार झाला. त्यानुसार एमटीएसपीएलला रोड रोलर बनवण्याच्या टेक्नाॅलाॅजी संबंधित सेवा द्यायची होती.
सरकारनं बदलला नियम 22 जुलै 1947ला मारुतीला 50 हजार कार निर्मितीसाठी इंडस्ट्रियल लायसन्स मिळालं. कंपनीला मिळणाऱ्या संरक्षणावर टीकाही होत होती. त्यावेळच्या इंदिरा गांधींना सफाई द्यावी लागली होती. 1977मध्ये इंदिरा गांधी निवडणूक हरल्या. कंपनीची स्थिती बिघडत होती. कार निर्मिती होऊ शकत नव्हती. 1977मध्ये जनता पार्टीचं सरकार बनलं. नव्या सरकारनं कंपनीची चौकशी सुरू केली. मारुतीला मिळाली सुझुकीची साथ मारुतीचं राष्ट्रीयकरण झालं. मारुती नव्या पार्टनरच्या शोधात होती. 1981मध्ये मारुती उद्योग लिमिटेड नाव देऊन कंपनीचं राष्ट्रीयकरण झालं. सोनिया गांधींचा कंपनीशी असलेला संबंध संपला. दरम्यान जपानी कंपनी सुझुकीने भारतात कारच्या प्राॅडक्शनसाठी सरकारशी संपर्क साधला. मारुती आणि सुझुकीच्या मधे 1982मध्ये करार झाला. 1983मध्ये अथक प्रयत्नांनंतर मारुती 800 ही पहिली कार बाजारात आली. त्यानंतर मारुती व्हॅन, जिप्सी बाजारात आल्या. VIDEO : ‘जंग का वक्त आ गया है’, असा आहे सेक्रेड गेम्स 2 चा ट्रेलर!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.