मुंबई, 9 जुलै : खासगी नोकरी करणाऱ्यांना सरकारनं मोठी भेट दिलीय. तुम्हाला दर महिन्याला 21 हजार रुपये पगार मिळत असेल, तर तुमचा पगार आता वाढणार. हा निर्णय 1 जुलै 2019पासून लागू होईल. सरकारनं कर्मचारी राज्य विमा निगम ( ईएसआय ) योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या काॅन्ट्रिब्युशनमध्ये कपात केलीय. या कपातीनंतर कर्मचाऱ्यांना आॅगस्ट महिन्यापासून जास्त पगार मिळणार. किती होणार फायदा? आतापर्यंत ESI काँट्रिब्युशनमध्ये 6.5 टक्के कपात होत होती. या कपातीत 1.75 टक्के हिस्सा कर्मचाऱ्याचा आणि 4.75 टक्के हिस्सा कंपनीचा होता. सरकारनं कपात करून 4 टक्के केलेत. त्यातले 0.75 टक्के कर्मचाऱ्यांच्या पगारातले तर कंपनीकडून 3.25 टक्के असतील. म्हणजे कर्मचाऱ्याच्या पगारात सरळ 1 टक्का वाढ होईल. म्हणजे ज्यांना दर महिन्याला 21 हजार रुपये पगार आहे, त्यांना 1 टक्का वाढ मिळेल. म्हणजे 210 रुपयांनी पगार वाढेल. आजपासून ‘या’ कंपनीची स्कुटर आणि बाइक झाली महाग या बदलानं कोणाचा होईल फायदा? या निर्णयामुळे देशभरात खासगी कंपनींमध्ये काम करत असणाऱ्या जवळजवळ 3 कोटी 60 लाखाहून जास्त कर्मचाऱ्यांना पगारवाढ मिळेल. याचा फायदा कंपनीलाही आहे. त्यांना विम्यावर कमी पैसे खर्च करावे लागतील. पावसाळ्यात सुरू करा ‘हा’ व्यवसाय, रोज 5 ते 10 हजाराची होईल कमाई जाणून घ्या या स्कीममधले फायदे कुठलाही कर्मचारी सहा महिन्यानंतर सुपर स्पेशॅलिटी हाॅस्पिटलमध्ये उपचार करू शकतात. कर्मचाऱ्याची पत्नी, मुलगा-मुलगी, आई-वडील यांचाही उपचार होऊ शकतो. पण त्यांचा महिन्याचा पगार 9 हजार रुपयापर्यंत हवा. कुठल्याही कर्मचाऱ्याच्या उपचारावर आता ESI 87.5 टक्के खर्च करते. बाकीचा 12.5 टक्के खर्च राज्य सरकार करतं. महिला कर्मचाऱ्याला 26 आठवडे मॅटरनिटीची सुट्टी मिळते. कर्मचारी दिव्यांग झाला तर त्याला एकूण पगाराच्या 90 टक्के रक्कम देण्याची सोय आहे. कर्मचारी बेरोजगार झाला तर त्याला नवी नोकरी मिळेपर्यंत भत्ता दिला जातो. ती रक्कम त्याच्या खात्यात टाकली जाते. विठुरायाच्या महापूजेसाठी मुख्यमंत्र्यांसह उद्धव ठाकरे सपत्नीक उपस्थित राहणार? कुणाला लागू होतं ईएसआय? ज्या कर्मचाऱ्यांचा पगार महिन्याला 21 हजारापेक्षा कमी आहे आणि तो किंवा ती कमीत कमी 10 कर्मचाऱ्यांच्या कंपनीत काम करतायत. 2016 पर्यंत ही रक्कम 15 हजार रुपये होती. 1 जानेवारी 2017ला त्यात वाढ होऊन ती 21 हजार रुपये केली. आता 6 कोटी लोकांना याचा फायदा होतोय. EXCLUSIVE VIDEO: पुढचा बाण विधानसभेलाच लागला पाहिजे- सुरेखा पुणेकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.