मराठी बातम्या /बातम्या /मनी /

तुमच्याकडे असलेले PAN Card बनावट तर नाही? दोन मिनिटात असं करा चेक

तुमच्याकडे असलेले PAN Card बनावट तर नाही? दोन मिनिटात असं करा चेक

पॅन कार्डचा QR कोड बनावट आणि ओरिजनल पॅन ओळखतो. यासाठी फक्त एक स्मार्टफोन आणि आयकर विभागाने जारी केलेले अॅप आवश्यक आहे.

पॅन कार्डचा QR कोड बनावट आणि ओरिजनल पॅन ओळखतो. यासाठी फक्त एक स्मार्टफोन आणि आयकर विभागाने जारी केलेले अॅप आवश्यक आहे.

पॅन कार्डचा QR कोड बनावट आणि ओरिजनल पॅन ओळखतो. यासाठी फक्त एक स्मार्टफोन आणि आयकर विभागाने जारी केलेले अॅप आवश्यक आहे.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 20 डिसेंबर : पर्मनंट अकाऊंट नंबर म्हणजेच पॅन कार्ड (PAN Card) आज देशातील सर्व नागरिकांसाठी एक महत्त्वाचे आणि आवश्यक कागदपत्र बनले आहे. हे विशेषतः बँक खाते उघडण्यासाठी किंवा मतदार ओळखपत्र (Voting Card) जारी करण्यासाठी आवश्यक आहे. त्यासोबतच आर्थिक व्यवहारांसह ओळख पुरावा (Identity Proof) दस्तऐवज म्हणून देखील याचा वापर केला जातो.

QR कोडने ओळखा

जुलै 2018 नंतर ज्यांना पॅन कार्ड जारी केले गेले आहे त्यांना ते Enhanced Quick Response कोडसह मिळाले आहे. पॅनचा वापर कर मूल्यांकनासाठी केला जातो. त्यामुळे फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यात क्यूआर कोड सुरू करण्यात आला. पॅन कार्डचा QR कोड बनावट आणि ओरिजनल पॅन ओळखतो. यासाठी फक्त एक स्मार्टफोन आणि आयकर विभागाने जारी केलेले अॅप आवश्यक आहे.

UPI Payment करताना राहा अलर्ट, छोटी चूकही रिकामं करेल तुमचं बँक अकाउंट

बनावट पॅन कार्ड कसे शोधायचे?

>> 'प्ले स्टोअर' वर जा आणि 'पॅन क्यूआर कोड रीडर' अॅप डाउनलोड करा.

>> लक्षात ठेवा की फक्त तेच अॅप डाउनलोड करा जे 'NSDL ई-गव्हर्नन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड' डेव्हलपर म्हणून दाखवते.

>> अॅप डाउनलोड केल्यानंतर, अॅप ओपन करा. कॅमेरा व्ह्यूफाइंडरवर तुम्हाला हिरवा प्लस ग्राफिक दिसेल.

>> व्ह्यूफाइंडरवरून तुमच्या पॅन कार्डवरील QR कोड कॅप्चर करण्याचा प्रयत्न करा जसे कॅमेरामध्ये चित्र काढतो.

>> QR कोड स्पष्टपणे दिसत असल्याची खात्री करा.

Cyber Dost Alert!सेकंदात गायब होऊ शकते तुमची कमाई,हे App चुकूनही डाउनलोड करू नका

>> कॅमेऱ्याने ते कॅप्चर केले की तुम्हाला बीप ऐकू येईल. यानंतर तुमचा फोन पॅन तपशीलांसह व्हायब्रेट होईल.

>> तुम्हाला फक्त कार्डचे तपशील तुमच्या फोनच्या तपशिलांशी जुळत असल्याची खात्री करायची आहे.

>> जर हे तपशील उपलब्ध असतील तर तुमचे पॅन कार्ड ओरिजनल आहे.

First published:

Tags: Central government, Pan card