मुंबई, 7 डिसेंबर : या वर्षाच्या शेवटच्या महिन्यातही आयपीओ मार्केटमध्ये मोठी रेलचेल दिसत आहे. या महिन्यात सलग अनेक IPO उघडत आहेत. या भागात, डिजिटल मॅपिंग कंपनी MapmyIndia चा IPO 9 डिसेंबर रोजी उघडेल. कंपनीने या IPO ची प्राईज बँड निश्चित केली आहे. कंपनीने शेअरची किंमत 1000 ते 1033 रुपये निश्चित केली आहे. कंपनीने IPO च्या माध्यमातून 1200 कोटी रुपये उभारण्याची योजना आखली आहे.
MapmyIndia हे Google Maps प्रमाणेच स्थान नेव्हिगेशन अॅप आहे. ISRO आणि MapmyIndia यांनी हे अॅप विकसित करण्यासाठी भागीदारी केली आहे. याशिवाय, कंपनी एमजी मोटर्स (MG Motors) आणि बीएमडब्ल्यू (BMW) कारची नेव्हिगेशन सिस्टम देखील चालवते.
IPO पूर्णपणे ऑफर फॉर सेलसाठी (OFS) असेल
मॅप माय इंडिया आयपीओ पूर्णपणे ऑफर फॉर सेलसाठी (Offer For Sale) असेल. यामध्ये कंपनीच्या सुरुवातीच्या गुंतवणूकदारांना त्यांचे स्टेक विकण्याची संधी मिळेल. डिजिटल मॅप मेकर मॅपमीइंडिया पब्लिक ऑफर (MapmyIndia IPO) साठी 9 डिसेंबर रोजी IPO लाँच करणार आहे. कंपनीने IPO च्या माध्यमातून 1200 कोटी रुपये उभारण्याची योजना आखली आहे.
केंद्र सरकारडून 22.55 कोटीं नागरिकांच्या खात्या पैसे ट्रान्सफर; तुम्हीही चेक करा
मॅप माय इंडियाचा मजबूत क्लाईंट बेस
कंपनी MapMy India आणि Mappls ब्रँड अंतर्गत उत्पादने, प्लॅटफॉर्म, अॅप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस (APIs) आणि डिजिटल मॅप डेटा, सॉफ्टवेअर आणि IoT मधील प्रोडक्ट्स यांचा समावेश आहे. कंपनीच्या ग्राहकांमध्ये PhonePe, Flipkart, Yulu, HDFC Bank, Airtel, Hyundai, MG Motor, Axis SafeExpress आणि वस्तू आणि सेवा कर नेटवर्क (GSTN) यांचा समावेश आहे.
शेअर बाजारात दोन दिवसात गुंतवणूकदारांचे 5.80 लाख कोटी बुडाले
Apple उत्पादने मॅप माय इंडिया पेमेंट गेटवे म्हणून वापरतात, जसे की Paytm, PhonePe किंवा McDonalds, Grofers, Cars24 सारखे ई-कॉमर्स फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म देखील या प्लॅटफॉर्मचा वापर करतात. SBI ब्रांच लोकेटर, बजाज फिनसर्व्ह, प्रसार भारती GTH डीलर लोकेटर यांसारख्या कंपन्यांचे स्टोअर लोकेटर देखील याचा वापर करतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Money, Share market