Home /News /money /

केंद्र सरकारडून 22.55 कोटीं नागरिकांच्या खात्या पैसे ट्रान्सफर; तुम्हीही चेक करा बॅलेन्स

केंद्र सरकारडून 22.55 कोटीं नागरिकांच्या खात्या पैसे ट्रान्सफर; तुम्हीही चेक करा बॅलेन्स

केंद्र सरकारने आतापर्यंत 22.55 कोटी लोकांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले आहेत. EPFO ने अधिकृत ट्विटर हँडलवर ही माहिती दिली आहे.

    मुंबई, 6 डिसेंबर : तुम्ही देखील पीएफ (PF Account)वर मिळणाऱ्या व्याजाच्या प्रतीक्षेत असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी फायदेशीर ठरु शकते. अनेक EPF खातेधारकांच्या खात्यात व्याजाची रक्कम जमा झाली आहे. केंद्र सरकारने आतापर्यंत 22.55 कोटी लोकांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले आहेत. EPFO ने अधिकृत ट्विटर हँडलवर ही माहिती दिली आहे. EPFO ने ट्वीट करत म्हटलं की, "2020-21 या आर्थिक वर्षात आतापर्यंत 22.55 कोटी लोकांच्या खात्यात 8.50 टक्के दराने पैसे ट्रान्सफर केले आहेत." तुम्हाला हे देखील जाणून घ्यायचे आहे की तुमच्या पीएफ खात्यात पैसे आले की नाही, तर तुम्ही सोप्या पद्धतीने ते चेक करु शकता. दोन मोठ्या ब्रोकरेज फर्मची ICICI Bank शेअर खरेदीची शिफारस, टार्गेट प्राईज दोघांचीही वेगळी कसा चेक कराल तुमचा बॅलेन्स? 1. SMS च्या माध्यमातून जाणून घ्या पीएफ बॅलन्स SMS च्या माध्यमातून तुमच्या पीएफ खात्यातील रक्कम तपासण्यासाठी तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून 7738299899 या नंबरवर मेसेज करावा लागेल. EPFOHO UAN ENG असे लिहून तुम्हाला हा मेसेज करावा लागेल. ENG म्हणजे इंग्रजी भाषेमध्ये तुम्हाला माहिती मिळेल. परंतू तुम्हाला अन्य कोणत्या भाषेत माहिती हवी असेल तर ENG ऐवजी तुम्हाला हव्या असलेल्या भाषेची पहिली तीन अक्षरं तुम्हाला टाकावी लागतील. हिंदी, पंजाबी, गुजराती, मराठी, कन्नड, तेलुगु, तमिळ, मलयाळम आणि बंगाली भाषेमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. या क्रमांकावर मेसेज करण्यासाठी ईपीएफओ मध्ये तुमचा नंबर रजिस्टर्ड असणे अनिवार्य आहे. 2. Missed Call च्या माध्यमातून जाणून घ्या PF Balance यूएएन पोर्टलवर नोंदणीकृत सदस्यांना मिस्ड कॉल देऊन त्यांच्या खात्यातील शिल्लक जाणून घेता येईल. आपल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून 011-22901406 वर एक मिस कॉल करावा लागेल. यानंतर पीएफचा तपशील तुम्हाला ईपीएफओच्या मेसेजद्वारे प्राप्त होईल. दोन रिंगनंतर हा कॉल स्वयंचलितपणे डिस्कनेक्ट होईल. या सेवेसाठी कोणतेही पैसे आकारले जाणार नाहीत. ईपीएफओ UAN सेवा प्रदान करते, ज्याद्वारे खातेदार त्यांच्या पीएफ खात्यातील शिल्लक पाहू शकता. Multibagger Stock : 'या' केमिकल शेअरची दमदार कामगिरी, वर्षभरात 130 टक्के रिटर्न्स 3. Umang App च्या माध्यमातून याकरता तुमचे उमंग App (Unified Mobile Application for New-age Governance) उघडा आणि ईपीएफओवर क्लिक करा. तुम्हाला एका वेगळ्या पेजवर इम्प्लॉयी-सेंट्रिक सर्विस (employee-centric services) वर क्लिक करावे लागेल. याठिकाणी व्ह्यू पासबुकवर क्लिक करा आणि तुमचा यूएएन नंबर आणि पासवर्ड (OTP) प्रविष्ट करा. ओटीपी तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड क्रमांकावर येईल. यानंतर तुम्ही तुमचा बॅलन्स तपासू शकता. याठिकाणी तुम्ही पासबुक पाहण्याव्यतिरिक्त क्लेम देखील करू शकता. हे एक सरकारी App आहे. तुम्ही विविध सुविधांचा फायदा या अॅपमधून घेऊ शकता. 4. वेबसाइटच्या माध्यमातून तपासा पीएफमधील शिल्लक याकरता तुम्हाला Epfindia.gov.in वर लॉग इन करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला ई-पासबुकवर क्लिक करावं लागेल. त्यावेळी तुम्ही passbook.epfindia.gov.in या नवीन पेजवर याल. याठिकाणी युजर नेम, तुमचा UAN क्रमांक, पासवर्ड आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करून ई-पासबुकवर क्लिक करा. याठिकाणी एक नवीन पेज ओपन होईल. याठिकाणी मेंबर आयडीवर क्लिक करा आणि अशाप्रकारे तुम्ही खात्याचील रक्कम वेबसाइटच्या माध्यमातून तपासू शकता.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Central government, PF Amount

    पुढील बातम्या